Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Sunday Horoscope in Marathi : कही राशींच्या लोकांसाठी भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरणार आहे. तर काहींचा दिवस आनंदी जाणार आहे.
Sunday Horoscope
Sunday Horoscope Saam tv
Published On

आजचे पंचांग

रविवार,६ जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष,शयनी एकादशी,चातुर्मास्यारंभ,पंढरपूर यात्रा,गुरू पूर्व दर्शन,मोहरम.

तिथी-एकादशी २१|१६

रास- तुला १६|०१ नं. वृश्चिक

नक्षत्र-विशाखा

योग-साध्य

करण-वणिज

दिनविशेष-विशाखा वर्ज्य

मेष - रागामुळे आपल्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. जुन्या झालेल्या चुकांमुळे कोर्टाची कटकट मागे लागली असेल तर आज निर्णय पटकन होतील. जोडीदाराला समजून घेणे आज गरजेचे आहे.

वृषभ - काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टी गमवाव्या लागतात. आज श्रेयस आणि प्रेय यामध्ये योग्य ते ठरवून निर्णय घ्यायला लागेल. अनेक जुन्या गोष्टी केलेल्या आत्ता लाभ मिळण्यासाठी अडचणीच्या ठरतील.

मिथुन - आज आषाढी एकादशी. विष्णू उपासना आपल्या राशीला विशेष फलदायी ठरणार आहे. देव देतो ते भरभरून हे आज लक्षात येईल. प्रारब्धामध्ये जे मिळाले आहे ते स्वीकारण्याची आज आपल्यामध्ये ताकत येईल.

Sunday Horoscope
Vastu Tips: घरात लाल आणि काळ्या मुंग्या येण्याचा अर्थ काय?

कर्क - घरातील कुटुंबीय एकत्रितरित्या हसून खेळून आनंदाचे वातावरण ठेवाल. विठ्ठलाच्या उपासनेमध्ये दंग रहाल. घरी पाहुण्यांची मांदियाळी होईल. जुने व्यवहार मार्गी लागतील. दिवस आनंदी आहे.

सिंह - जवळच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. भाग्य आणि कर्माने मिळालेल्या गोष्टी आज हाती मिळण्याचा दिवस आहे. जिद्द आणि चिकाटीने पेटून उठाल.

कन्या- हरवले ते गवसेल का? असा काहीसा आजचा दिवस आहे. जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायला लागेल. करिअरमध्ये मात्र नवनवीन संकल्पनेने भरीव योगदान द्याल. पैशाशी निगडित आवक जावक चांगली राहील.

Sunday Horoscope
Vastu For Money : घरात पैसा टिकत नाहीये? खिसा ही होतोय रिकामा? मग करा लगेचच हे महत्वाचे बदल

तूळ - आनंदाला पारावर राहणार नाही. काहीतरी चांगल्या गोष्टी कानावर येतील. स्वत्व मिळून जाईल. आरोग्यही उत्तम राहील. आज मोठी एकादशी आहे. विठ्ठलाच्या उपासनेमध्ये मग्न राहाल.

वृश्चिक - मनोबल कमी राहील. परदेश गमनाची किंवा मोठ्या प्रवासीची निगडित बैठक असतील तर आज योग्य पद्धतीने पार पडतील. कामाला धरबंद राहणार नाही इतके काम राहील. बंधन योग सुद्धा येतील.

धनु - व्यवहारांमध्ये आज चतुराई ठेवणं गरजेचे आहे. आपले आणि परके ओळखून कामे करा. सून जावई यांच्याकडून कौतुकामध्ये दिवस व्यस्त राहील. स्नेहभोजनाचे विशेष योग आहेत.

Sunday Horoscope
Vastu Tips For Women's: वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी 'या' ७ चुका अजिबात करु नये

मकर - धावपळीचा दिवस राहील. कर्माला प्राधान्य देऊन काम कराल. राजकारणात समाजकारणामध्ये यश मिळेल. शनि महाराजांची कृपा आज आपल्यावर राहणार आहे. करिअरच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत.

कुंभ - विठ्ठलाच्या उपासनेमुळे भाग्यकारक घटना घडतील. पौत्र सौख्य भरभरून मिळेल. नवनवीन चांगल्या गोष्टी कानावर येतील. दिवस आनंदाचा जाईल.

मीन- मोठ्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील. एकट्याच्या जीवावर कामे करावे लागतील. सरकारी कामांमध्ये मात्र आज थोडी खबरदारी घ्यावी. दिवस संमिश्र राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com