Rashi Bhavishya : सुखकर गोष्टी घडतील; दिवस लाभाचा जाईल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Horoscope Today 28 September 2024 : आजचे पंचांग - शनिवार २८ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. इंदिरा एकादशी. तिथी-एकादशी. सुखकर गोष्टी घडतील; दिवस लाभाचा जाईल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य...
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Daily Horoscope Today TodaySaam TV
Published On

आजचे पंचांग - शनिवार २८ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. इंदिरा एकादशी. तिथी-एकादशी १४|५०. रास-कर्क. २७|३८ नं. सिंह. नक्षत्र-आश्लेषा. योग-सिध्दीयोग. करण-बालव. दिनविशेष-चांगला दिवस.

मेष - काहींना कामानिमित्त प्रवास घडतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल.

वृषभ - नोकरी व्यवसायात उत्तम गती राहील. शत्रू पीडा नाही. दिवस बरा आहे.

मिथुन - कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याचे योग आहेत.

कर्क - आजच्या दिवसात वरिष्ठांच्या सहकार्य लाभणार आहे .मनामध्ये एक वेगळा आनंद आणि आशावाद राहील. दिवस चांगला जाईल.

सिंह - धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. उपासनेकडे कल ठेवा. मानसिकता जपावी लागेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्या.

कन्या - अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार आज पार पडण्याचे योग आहेत. दिवस लाभाचा जाईल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Budhaditya Rajyog: तूळ राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

तूळ - तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. असतील तर योग्य ते डॉक्टर मिळाल्यामुळे मनाला शांतता लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र आज वाढते राहणार आहे.

वृश्चिक - दैनंदिन कामे मार्गी लागतील. सहजगत्या काम होताना आज दिसून येईल तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन सुसंधी मिळेल. प्रसिद्धीचे योग आहेत. उपासनेच्या दृष्टीने आज एकादशी असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होईल.

धनु - वाहने चालवताना आज जरा जपून चालवा. तब्येतीची तक्रार राहील. मनोबल त्यामुळे कमी राहील. काळजी घ्या.

मकर - आपल्या मतांविषयी आपण आग्रही राहणार आहात. ओळखी होतील त्यातून नवीन कामे मिळतील. सुखकर गोष्टी घडतील.

कुंभ - मनोरंजनाकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता एकला ची चलो असा आजचा दिवस आहे.

मीन - संतती सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शेअर्स, लॉटरीमध्ये आज फायद्याचा दिवस दिसतो आहे. आज इंदिरा एकादशी विष्णू उपासना विशेष फलदायी ठरेल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Samsaptak Rajyog: गुरु-शुक्राच्या युतीने तयार होणार समसप्तक राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com