Budhaditya Rajyog: तूळ राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Budhaditya Rajyog In Tula: आगामी काळात सूर्य आणि बुधाच्या गोचरमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या काळात कोणत्या राशींचं आयुष्य उजळणार आहे, ते पाहूयात.
Budhaditya rajyog
Budhaditya rajyogSaam tv
Published On

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एकाच राशीत दोन ग्रह आल्याने राजयोग देखील तयार होते. आगामी काळात सूर्य आणि बुधाच्या गोचरमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. 17 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत गोचर करणार आहे. 10 ऑक्टोबरला बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा काळात तब्बल एका वर्षानंतर शुक्राच्या घरात बुध आणि सूर्याची युती होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात कोणत्या राशींचं आयुष्य उजळणार आहे, ते पाहूयात.

Budhaditya rajyog
Rajyog : 500 वर्षांनंतर बनले ३ राजयोग; दिवाळीपूर्वी चमकणार 'या' राशींचं नशीब

तूळ रास

सूर्य आणि बुध यांची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला अतिरीक्त पैसे मिळणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. कुटुंबामधील वाद कमी होणार आहेत.

मकर रास

सूर्य आणि बुध यांचा संयोग या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात कमाईच्या अनेक उत्तम संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकणार आहे.

कुंभ रास

सूर्य आणि बुध यांची युती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणा आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी होणार आहे. तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकणार आहात. तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत.

Budhaditya rajyog
Samsaptak Rajyog: गुरु-शुक्राच्या युतीने तयार होणार समसप्तक राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com