Mrigashira Nakshatra: मृग नक्षत्रात जन्म झालेल्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा असतो? जाणून घ्या 'या' खास गोष्टी

Mrigashira Nakshatra astrology: मृग नक्षत्र हे मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणारे आहे. या व्यक्ती प्रकृतीने फारश्या धिप्पाड नसतात. काहीशा उंच, मध्यम बांधाच्या, शारीरिक जीवशक्ती सुद्धा मध्यम असते.
Mrigashira Nakshatra characteristics
Mrigashira Nakshatra personality traits canva
Published On

मृग नक्षत्र हे मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणारे आहे. या व्यक्ती प्रकृतीने फारश्या धिप्पाड नसतात. काहीशा उंच, मध्यम बांधाच्या, शारीरिक जीवशक्ती सुद्धा मध्यम असते. खूप शारीरिक श्रम करण्याची वृत्ती कमी, महत्त्वकांक्षा असतेच असे नाही. पण नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, स्वच्छता या गोष्टींकडे कल असतो. सौंदर्य कला बुद्धिमता या जातकाला आहे. न्याय देणारे असतात. स्त्रियांना हे नक्षत्र जास्त मानवते.

यांना घराबद्दल कुटुंबाबद्दल अतिशय ओढ असते, संसार संगोपन या नक्षत्राच्या स्त्रिया चांगल्या करू शकतात. मृग नक्षत्राचे लोक मैत्रीला घट्ट असतात. मित्रां शिवाय यांचे आयुष्य निरस असते. बालपणीच्या मैत्रीला घट्ट धरून ठेवतात. म्हणून मित्रांची संगत कोणती याकडे नेहमी सतर्क असावे. हरणासारखी चपळाई यांच्याकडे असते.

Mrigashira Nakshatra characteristics
Horoscope: 'या' राशींच्या जीवनात आज मिळणार प्रियकराचे सुख; वाचा आजचे राशीभविष्य

मानसिक, बौद्धिक तत्परता असते यांच्या बोटांच्या हालचाली खूप वेगावान असतात. माऊस चालविणे, तबला वाजवणे, कराटे या क्रिया वेगात करू शकतात. लेखन करायला यांना आवडत असते. संवेदनशील नक्षत्र आहे. जनरल नॉलेज चांगले, मिडियाशी सुसंगत संबंध असतात. या नक्षत्रांच्या व्यक्तींची सहज प्रवृत्ती असते. बिघडल्यास चिडणे, वाचाळ अस.

नोकरी व्यवसाय -

लेखक, प्रकाशक, ऑडिटर, किरकोळ व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, पोस्ट खाते, फिरते एजंट, बँक, दळण वळण खाते यासंबंधी व्यवसाय नोकरी असू शकतात. इलेक्ट्रिक -इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय वा नोकरी.कलाकार, वादक या गोष्टींमध्ये लोक असू शकतात.

रोग - आजार -

सर्दी, कफ, खोकला, थंडीताप, धाप लागणे, बुध बिघडल्यास मज्जातंतू दुर्बल होणे, चक्कर येणे, मानसिक चिंता हे त्रास होतात. अपचन, ऍसिडिटी तोंड येणे, मलावरोध, शारीरिक पीडा सहन कराव्या लागतात.

Mrigashira Nakshatra characteristics
Walking Benefits: वॉक करताना इअरफोन लावणं फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com