Hari Narke News in Marathi: हरी नरके यांचे लेखन आणि पत्रव्यवहार जतन करणार: पंकज भुजबळ

Hari Narke News in Marathi: माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत नरके परिवाराला २५ लाखांची आर्थिक मदत दिली गेली.
Hari Narke News in Marathi
Hari Narke News in MarathiSaam tv
Published On

रुपाली बडवे

Pankaj Bhujbal News:

फुले- शाहू - आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, इतिहास संशोधक प्रा. हरी नरके सर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते मार्गदर्शक होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे नरके सरांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आज दिवंगत हरी नरके यांच्या निवासस्थानी छोटेखानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत नरके परिवाराला २५ लाखांची आर्थिक मदत दिली गेली. (Latest Marathi News)

दिवंगत हरी नरके यांच्या निवासस्थानी छोटेखानी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार पंकज भुजबळ म्हणाले, 'प्रा.हरी नरके यांचे प्रत्येक क्षेत्रातले योगदान खूप मोठे आहे. त्यांची अनेक भाषणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेली आहेत त्यांनी केलेले पत्रव्यवहार देखील अभ्यास करण्यासारखे आहेत त्यामुळे ही सर्व भाषणे, त्यांचे लेख, त्यांचे पत्रव्यवहार हे जतन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे'.

Hari Narke News in Marathi
Bhandara Farmer Success Story: कारले,स्वीटकॉर्न,लाल टोमॅटोच्या शेतीतून ३ भावंडे लखपती; सुशिक्षित तरुणांच्या यशाचं गुपित काय?

'हरी नरके हे समता परिषदेचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते आज आमचा आधारस्तंभ आमच्या मध्ये नाही परंतु आम्ही समता परिषदेच्या वतीने हरी नरके यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम घेत राहू अशी माहिती देखील पंकज भुजबळ यांनी दिली

Hari Narke News in Marathi
Breaking News: 'NDA' मधील चार घटक पक्ष India आघाडीत सामील होणार, काँग्रेसचा मोठा दावा

तत्पूर्वी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिलाध्यक्षा मंजिरी धाडगे, वैष्णवी सातव, गौरी पिंगळे, सपना माळी, नागेश गवळी, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, शिवराम जांभूळकर , सागर दरोडे, प्रदीप हुमे, त्याचबरोबर प्रा. हरी नरके यांच्या पत्नी संगीता नरके आणि मुलगी प्रमीती नरके यावेळी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com