Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींचं शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष
जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता राहील. भागीदारीत कटकटी संभवतात. मात्र, सप्ताहात होणारी चंद्र-गुरू युती आनंदाची बातमी देणारी आहे.
वृषभ
मंगळ षष्ठस्थानी आल्यामुळे हितशत्रूवर विजय मिळवाल. नोकरीत बदल करण्यासाठी अनुकूल काळ.
मिथुन
मुलांशी मतभेद संभवतात. शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते. धार्मिक कार्याची, नवीन शिक्षणाची आवड निर्माण होईल.
कर्क
घर-जागेवरून कटकटी संभवतात. घरापासून दूर बदलीची शक्यता राहील. व्हिसा पासपोर्टची कामे होतील.
सिंह
मोठे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. उत्तरार्धात होणारी चंद्र-शुक्र युती उत्साह वाढविणारी आहे.
कन्या
कुटुंबात मोठे वादविवाद होण्याची शक्यता असून, स्पष्टवक्तेपणा टाळावा. सप्ताहात होणारी चंद्र-गुरू युती नोकरी व्यवसायामध्ये मोठे बदल करणारी.
तूळ
जोडीदाराशी खटके उडतील व डोके गरम राहील. सप्ताहातील चंद्र-गुरू युती अभ्यासात यश देणारी राहील.
वृश्चिक
आर्थिक ताण सहन करावा लागेल. वादविवादाचे प्रसंग संभवतात. वडिलोपार्जित-वारसा हक्काची कामे होतील.
धनू
मित्र-सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. चंद्र-गुरू युती विवाह इच्छुकांचे विवाह जमविणारी राहील.
मकर
सप्ताहात होणारी चंद्र-गुरू युती नोकरीमध्ये चांगला बदल करणारी असून, हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळेल.
कुंभ
गुरुजनांशी विसंवाद टाळावेत. विद्यार्थ्यांना अभ्यास-परीक्षेत श्रम पडतील. उपासनेत खंड पडेल.
मीन
आरोग्याची तक्रार वाढेल. नुकसान सहन करावे लागतील. घर-वाहन खरेदीसाठी उत्तम काळ आहे
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.