
सोमवार,३० जून २०२५,आषाढ शुक्लपक्ष.
तिथी- पंचमी ०९|२४
रास- सिंह
नक्षत्र- मघा
योग- सिद्धीयोग
करण-बालव
दिनविशेष-१७ प.चांगला
मेष - धडपडया वृत्तीमुळे कामे आपलीशी कराल. क्रीडा क्षेत्रात प्रगती आहे. संततीचे धाडस सुद्धा कामी येईल. गणेश उपासना फलदायी ठरेल.
वृषभ - घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या शकले लढवाल. नव्याने खरेदी होईल. जुन्याचे नवे करण्यासाठी आज जंग बांधून कामे कराल. कुटुंबीयांचे सहकार्य उत्तम राहील.
मिथुन- कामामध्ये जीव ओतून काम कराल. जिद्द आणि चिकाटीने क्षितिज आपलेसे कराल.आपल्याच पराक्रमावर आपण खुश होऊन जाल. दिवस चांगला आहे
कर्क - पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील. विविध पदार्थ बनवण्याची आज जणू काही शर्यतच आहे अशी भावना येईल. पैशाची आवक-जावक चांगली असल्यामुळे मनस्थिती सुद्धा छान राहील.
सिंह - आत्मसन्मान बाळगून राहाल. आत्मविश्वास वाढेल. इतरांवर आपला प्रभाव राहील. आरोग्यदायी आणि उत्तम असा दिवस आज आपल्याला लाभलेला आहे.
कन्या - विनाकारण कशाचा हिशोब ठेवायचा आणि सकारण कशाचा ठेवायचं नाही या दोन्हीचा ताळमेळ ठेवा. मनस्ताप टाळण्यासाठी झालेला पैसा खर्च उपयोगात येतोय ना? हेच विचार करून सोडून देणे योग्य आहे.
तूळ - प्रेमासाठी काहीतरी वेगळे आपल्याला आज करावे लागेल. समोरच्याचे म्हणणे मान्य करून पुढे जावे लागेल. मनोरंजन क्षेत्रामध्ये धडाडीचे पाऊल आज पडेल. विविध लाभ होतील.
वृश्चिक - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजकारणामध्ये मान मिळेल. केलेल्या कामाची पोचपावती जवळच्या लोकांकडून आज नक्की मिळणार आहे.
धनु - दत्त उपासना फलदायी ठरेल. ठरवलेल्या गोष्टी तशाच घडतील. नवनवीन कामांमध्ये पाऊल टाकाल आणि यशपादाकांत कराल. दिवस आनंदी आहे.
मकर - अचानक मोठे धन लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण कष्टाला आज पर्याय नाही हे तितकेच लक्षात ठेवा. आपल्याबरोबर कोण आहे कोण नाही याचा ना विचार न करता काम केलेले बरे.
कुंभ - जोडीदाराचा विचार प्रथम येईल. काम करताना एकत्रित रित्या मिळून काम कराल. व्यवसायामध्ये कामाला उधाण येईल. यश जवळ आले आहे याची खात्री होईल.
मीन - पाण्यापासून सावध राहा. पोटाशी निगडित आजार होतील. मनस्थिती जपावी लागेल. नोकरीमध्ये मात्र गती आणि प्रगती दोन्ही आहे. दिवस संमिश्र असेल .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.