Neechbhang Rajyog: बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश करताच बनणार नीचभंग राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीत मिळणार नफा

Neechbhang Rajyog: बुध ग्रहामुळे तयार होणाऱ्या या नीचभंग राजयोचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांच्यावर याचा चांगला परिणाम दिसून येणार आहे.
Neechbhang Rajyog
Neechbhang RajyogSaam TV
Published On

ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. मार्चमध्ये बुध ग्रह आपल्या निम्न राशीच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दुर्मिळ नीचभंग राजयोग तयार होणार आहे.

बुध ग्रहामुळे तयार होणाऱ्या या नीचभंग राजयोचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांच्यावर याचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

नीचभंग राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीच्या १२व्या भावात स्थित असणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करूनही तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावातून आराम मिळू शकणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत.

Neechbhang Rajyog
१०० वर्षांनंतर होणार सूर्य ग्रहण आणि सूर्य-शनीच्या युतीचा संयोग; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, मान-सन्मान मिळेल

मीन रास

नीचभंग राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या चढत्या घरावर तयार होणार आहे. तुमचा आत्मविश्वासही वाढण्याची शक्यता आहे. यावेळी व्यावसायिक जीवनात मोठं यश मिळणार आहे. व्यवसाय वाढेल आणि नवीन भागीदारीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक क्षेत्रात लाभाची शक्यता आहे.

Neechbhang Rajyog
Shani Gochar : मार्च महिन्यात मीन राशी शनी गोचर, चांदीच्या पावलांनी चालणार शनीदेव; 'या' राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

वृषभ रास

नीचभंग राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या राशीतून 11व्या घरात तयार होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकणार आहेत. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या संधीही मिळू शकणार आहेत.

Neechbhang Rajyog
Surya-Shani Yuti: होळीमध्ये शनीची शत्रू ग्रहाशी होणार युती; 'या' राशींवर संकटांचे ढग, मोठी हानी होणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com