Horoscope Today: आज उजळणार 3 राशींचं नशीब; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

Horoscope Today in Marathi: आज काही राशींच्या लोकांना जवळच्या लोकांकडून त्रास संभावण्याची शक्यता आहे. तर काहींचं खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
Rashi Bhavishya Today
Rashi Bhavishya Saam Tv
Published On

रविवार,२४ नोव्हेंबर २०२४,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी- नवमी २२|२०

रास-सिंह २९|०२ नं. कन्या

नक्षत्र-पूर्वा

योग- वैधृति

करण-तैतिल

दिनविशेष-१२ नं. चांगला

मेष - आपली रास चर रास आहे. वाहन चालवणे आपल्याला आवडते. आज दृतगती प्रवास घडतील. मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. भगवंताची योग्य साथ लाभेल व भाग्य मिळेल.

वृषभ - कामाचा व्याप वाढता राहणार आहे. बॉसच्या सहकार्याने पुढे जाल. इतर सहकारी तुमच्या मोठेपणावर जळतील. समाजकारणामध्ये यश राहील. सगळ्यांना आज सांभाळून घ्याल.

Rashi Bhavishya Today
Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

मिथुन - डाव्या कानाची निगडित आजार संभवत आहेत. तब्येतीची काळजी घ्यावी. जुनी गुंतवणूक फला फळाला येताना आज योग दिसून येत आहेत. आपला आनंद जो कुपीत ठेवलाय तो आज दरवळेल.

कर्क - जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आज सगळे अलबेलच राहील असे नाही. मना विरुद्ध घटना घडतील. आपल्या राशीचे गुण आहेत तसेच कुठून तरी दुखावल्या गेल्यामुळे नाराज असाल.

सिंह - "हाती चले बजार" असे आज टेचात रहाल. चांगल्या वाईट ची पारख विशेष दाट होईल. सरकारी ओळखीने कामे होतील. आपला दबदबा सर्वत्र राहील.

कन्या - मोठी गुंतवणूक आज होण्याची शक्यता आहे. यामध्ये आपल्या कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे आज योग्य राहणार नाही. दिवस संमिश्र राहील.

तूळ- प्रेमाचा लाभ होईल. मनाने जवळ असाल तरी त्यातील व्यवहाराच्या गोष्टींना आज पूर्णत्व येईल. महत्त्वाच्या बैठका पार पडतील. प्रवासातून फायद्याची दाट शक्यता आहे.

Rashi Bhavishya Today
Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

वृश्चिक- सहज, सुलभ दिवस असावा असे असे प्रत्येकालाच वाटते. काही वेळेला घटना मनासारख्या घडत नाहीत. त्यावेळी आपली शांती शाबूत ठेवावी लागते. विनाकारण आपल्यावर दोषारोप केले जाईल. परिस्थितीवर काबू ठेवा.

धनु - प्रेमामध्ये यश मिळेल. शेअर्स निगडित काही गुंतवणूक करणार असाल, पैशाचे काही हिशोब असतील तर ते आज पूर्णत्वास जातील. जोडीदाराकडून विशेष लाभ होईल.

मकर- गुडघेदुखी, हाडांचे दुखणे, सर्दीचे त्रास डोके वर काढतील. जुन्या आजारांपासून काळजी घेणे गरजेचे आहे. पैशाला अनेक वाटा फुटतील. गुप्त कारवायांनी आज त्रस्त होऊन जाल. आज स्वतःचे सामर्थ्य वाढवा.

कुंभ - "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे" आज संसारामध्ये तडजोड स्विकारावी लागेल. काही विरोधाभास व्यवसायात सुद्धा मान्य करावे लागतील. तर दिवस सुरळीत राहील.

मीन - मन आणि शरीर या दोघांचे आज द्वंद्व राहील. स्वस्थ बसावे वाटले तरी होणार नाही. शारीरिक श्रम आणि धावपळ वाढेल. अचानक धनलाभाची आज शक्यता आहे. दिवस संमिश्र राहील.

- ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

Rashi Bhavishya Today
Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com