Horoscope: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तीन राशींना लागणार लॉटरी, प्रगतीसह घरात येणार पैसाच पैसा

Ketu Transit Lottery : जानेवारी २०२६ मध्ये केतुचे पहिले गोचर महत्त्वपूर्ण बदल आणणारं आहे. हे गोचर खर्चात घट, संबंध सुधारणे आणि अचानक आर्थिक लाभाचे संकेत देणारं ठरेल. केतुच्या या गोचरमुळे ३ राशींना लॉटरी लागणार आहे.
Ketu Transit  Lottery
Ketu transit in January 2026 is set to bring unexpected financial gains and fortune.saam tv
Published On
Summary
  • जानेवारी २०२६ मध्ये केतूचे पहिले महत्त्वपूर्ण गोचर होणार.

  • केतू गोचरामुळे खर्च कमी होऊन आर्थिक स्थैर्य वाढेल.

  • तीन राशींना लॉटरी व अचानक धनलाभाचे योग.

ज्योतिषशास्त्रात केतूला छाया ग्रह मानले जाते. तो अध्यात्म, त्याग, मोक्ष आणि भूतकाळातील कर्मांचा कारक मानला जातो. केतू भौतिक सुख काढून टाकत व्यक्तीला आध्यात्मिक मार्गाकडे घेऊन जातो. याव्यतिरिक्त ते अनपेक्षित घटनां केतु घडवून आणत असतात. म्हणूनच केतूच्या राशीतील बदल, तसेच त्याचे नक्षत्र आणि नक्षत्र स्थिती, ज्योतिषशास्त्रात महत्त्वपूर्ण आहेत.

पंचांगनुसार जानेवारी २०२६ मध्ये केतूचे पहिले गोचर होणार आहे. केतु ग्रह २५ जानेवारी रोजी पूर्वाफाल्गुनी द्वितीयाच्या पदावरून पूर्वाफाल्गुनी प्रथम पदाकडे जाणार आहे. केतू मार्च २०२६ पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. ज्योतिषी हर्षवर्धन शांडिल्य सांगतात की, केतूचे हे संक्रमण अनावश्यक खर्च कमी करणार असेल, नात्यांमधील अंतर दूर करेल आणि संपत्तीच्या संधी निर्माण करेल.

Ketu Transit  Lottery
Astrology: बुध ग्रहाची 'या' ३ राशींवर असणार कृपा, धन प्राप्तीसह मिळेल प्रसिद्धी

सिंह

हे केतुचे भ्रमण सिंह राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणारे ठरेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा लॉटरीच्या संधींमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. आदर आणि कीर्ती वाढेल. त्यांच्या कामाच्या ठिकाणी सिंह राशीच्या जातकांची एक वेगळी ओळख निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण येईल आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. या काळात प्रभावशाली लोकांशी संबंध वाढतील.

Ketu Transit  Lottery
Hans MalavyaRajyog: नव्या वर्षात 'या' राशींचे जातक होणार मालमाल; हंस-मालव्य राजयोगानं येणार श्रीमंत होण्याचे योग

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी, केतुचे हे भ्रमण आर्थिक चमत्कार ठरू शकते. त्यांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्यास सुरुवात होईल. कौटुंबिक मालमत्ता किंवा वारसेतील लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील जातकांना त्यांचे नशीब त्यांना साथ देतील. हे जातक जोखीम घेतील त्यांना यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल आणि जीवन अधिक स्थिर होईल. पदोन्नती किंवा पगार वाढ शक्यता आहे.

वृश्चिक

केतुचे गोचर वृश्चिक राशीसाठी देखील शुभ ठरणार आहे. या राशीच्या जातकांना आर्थिक बाबतीत अनपेक्षित यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल. आध्यात्मिक विचारसरणी वाढेल, तसेच भौतिक सुखसोयीही वाढतील.

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषीय विश्वासांवर आधारित आहे आणि केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आलीय. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com