Horoscope Today : वटपौर्णिमेच्या दिवशी जुळून आला खास योग; आज 'या' राशींच्या लोकांचे चंद्रासारखे चमकणार नशीब

Rashi Bhavishya Today 21 June 2024 : वटपौर्णिमेला खास योग जुळून आला आहे. आज काही लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल. तुमची रास यात आहे का? वाचा आजचं संपूर्ण राशी भविष्य
Rashi Bhavishya
Today's Rashi Bhavishya 21th June 2024, Horoscope TodaySaam TV
Published On

आजचे पंचाग - वार शुक्रवार

दिनांक २१ जून २०२४. तिथी - ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी. नक्षत्र - जेष्ठा. योग - शुभ. करण- वणिज. रास - वृश्चिक. वटपौर्णिमा. दिनविशेष - १९ नंतर चांगला.

मेष : कामाचा त्रास होईल

खरंतर "गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरू गेले हेलपाट्याने" असा आज दिवस आहे. केलेले काम कितीही बरोबर वाटले तरी हाती काही लागणार नाही. त्याच त्याच कामाचा त्रास होईल. मनस्ताप आणि शारीरिक ताण त्रास याचा दिवस.

वृषभ : मनासारख्या गोष्टी घडतील

"सखी मंद झाल्या तारखा" असा आजचा दिवस आहे. कामावरून येताना जोडीदाराची ओढ वाटेल. अर्थात आज वटपौर्णिमेचा दिवस खास आहेच. एकमेकांसाठी काहीतरी करण्याची जाणीव होईल. दिवसभराच्या कामात व्यवसायाच्या आणि कोर्टाच्या गोष्टी मनासारख्या होतील.

मिथुन : शांत बसाल तर बरं होईल

आज आपल्या स्वभावाला मुरड घालून जरा शांत बसलात तर बरं होईल. काही वेळेला आपल्या बोलण्याचा विपर्यास आपल्याच माथी येण्याची शक्यता आहे. हाताखाली लोकांकडून त्रास होईल काळजी घ्या.

कर्क : संततीच्या सुवर्ता मिळतील

"देवाजीच्या दारी आज रंगला अभंग" असा आजचा दिवस आहे. उपासनेमध्ये मन रमेल. संततीच्या सुवर्ता मिळतील. दिवस आनंदी राहील. पतीसाठी विशेष देवाची उपासना कराल.

सिंह : काही चांगल्या घडतील

आपले छान व्हावे अशी प्रत्येकालाच भावना असते आणि त्या दृष्टीने आज काही चांगल्या गोष्टी कुटुंबीयांशी निगडित घडतील. जमीन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील. समाधानाचा दिवस.

कन्या : कामाची कीर्ती वाढेल

भावंडांचे विशेष सहकार्य लाभेल. केलेल्या कामाची कीर्ती वाढेल. छोटे प्रवास घडतील. पत्रव्यवहार सुरळीत होतील.

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya : वृषभसह 5 राशींच्या लोकांना आज हवं ते मिळेल; तुमची रास?

तूळ : दिवस आज सोन्याचा

लक्ष्मी प्राप्तीसाठी "दिवस आज सोन्याचा" आहे. त्यामुळे पैशाची आवक जावक चांगली राहील. गुंतवणूक फायद्याची ठरेल. कुटुंबीयांमध्ये सख्य राहील.

वृश्चिक : सकारात्मकता वाढेल

"आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा" असा आजचा दिवस राहणार आहे. नवीन उमेद नवीन स्वप्न घेऊन आजचा दिवस आलेला आहे. सकारात्मकता वाढेल.

धनु : मनस्थिती नीट ठेवा

कुठेतरी आपण अडकलोय विनाकारण त्रास मनस्ताप असे विचार आपल्याला घेराव घालतील. यासाठी मनस्थिती नीट ठेवणं हे आपल्या हातात आहे. जोडीदाराला समजून घ्या मानसिकता ठीक राहील.

मकर : "सोने पे सुहागा" दिवस

जुन्या ओळखी आणि गाठीभेटीतून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. "सोने पे सुहागा" असा आजचा दिवस आहे. सर्व गोष्टींना सारख्या घडतील .

कुंभ : "इंद्रधनु पेलण्याचा" दिवस

काहीतरी जोश नवीन उमंग घेऊन आजचा दिवस आलेला आहे. कामात स्वतःला झोकून द्याल. कामांमध्ये नवीन "इंद्रधनु पेलण्याचा" आजचा दिवस आहे. त्यामुळे जोमाने काम मला लागा.

मीन : पतीसाठी विशेष उपासना करा

आपली रासच मुळात प्रेमळ आहे. आज वटपौर्णिमेनिमित्त पतीसाठी विशेष उपासना करा. या उपासना फलदायी ठरतील. धार्मिकता आज आपल्या रक्तातच राहील.

Rashi Bhavishya
Tula Rashi Bhavishya : तूळ राशीच्या लोकांमध्ये असतात 'या' खास गोष्टी, जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि गुण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com