Rashi Bhavishya : वृषभसह 5 राशींच्या लोकांना आज हवं ते मिळेल; तुमची रास?

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या लोकांना आज शारीरिक श्रम, कष्ट, दगदग जाणवेल. गुप्तधनाची उगाचच ओढ वाटेल. गुढ प्रश्न मनाला सतावतील.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आयुष्याचे नवीन स्वप्न पाहाल. कोर्टकचेरीचे निर्णय मनाप्रमाणे लागतील.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

मिथुन राशीच्या महिलांना आज माहेरची विशेष ओढ वाटेल. मामांचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीतून मार्ग काढाल.

मिथून राशी भविष्य | Saam TV

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदात जाईल. प्रणयी आणि गुलाबी रंग आज दिवसात भरतील. कामाच्या ठिकाणी व्यापकता वाढेल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा कुटुंबियांवर धाक आणि दरारा. पण उगाचच दहशत निर्माण करू नका. अन्यथा विनाकारण त्रास वाढेल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

कन्या राशीच्या लोकांचा आज उदो उदो होईल. आपल्याकडे कलागुणांचे इतरांकडून कौतुक होईल. एकूणच आकाशाला गवसणी घालणारा दिवस.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आज आनंद आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळतील. त्यामुळे कुठलेही टेन्शन न घेता दिवसाची मजा लुटा.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक आज स्वतःमध्ये मग्न आणि व्यस्त राहतील. काही गोष्टी इतरांना दिल्यामुळे आपल्या वृद्धिंगत होतील. सकारात्मक राहाल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

धनु राशीसाठी आजचा दिवस काही अडचणीचा असेल. ठरवून केलेल्या गोष्टीतही अडचणी येतील. मानसिक अस्वस्थता आणि खर्च वाढेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मकर राशीच्या लोकांवर आज शनिदेवाची विशेष कृपा राहील. जुनी रेंगाळलेली कामे आज मार्गी लागतील. अनेक प्रकारचे लाभ होतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आज तळपत्या सूर्यासारखे काही गोष्टी आयुष्यात घडतील. आपल्या बुद्धी चातुर्यावर आपण खुश राहाल. यशाचा टप्पा गाठाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

मीन राशीचे लोक आज अध्यात्मात मग्न राहतील. आपल्याकडून कोणाचंही वाईट होणार नाही याची पोटतिडकीने काळजी घेतील.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : रविनाचा स्टनिंग लूक; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Raveena Tandon Photos | instagram