Horoscope Today : लॉटरी, रेस, शेअर्समध्ये फायदा होणार, तर काहींना अपमानाचे घोट पचवावे लागतील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today in Marathi : आज काही राशींच्या लोकांना लॉटरी, रेस, शेअर्समध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तर काहींना अपमानाचे घोट पचवावे लागतील. वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

गुरुवार,५ डिसेंबर २०२४,मार्गशीर्ष शुक्ल पक्ष.

तिथी- चतुर्थी १२|५०

रास-मकर

नक्षत्र-उत्तराषाढा

योग- वृद्धि

करण-विष्टिकरण

दिनविशेष-१३ नं.चांगला

मेष - समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टींमध्ये आज आपली योग्य घोडदौड होईल. पडद्यामागचे भूमिका घेण्यापेक्षा आपण केलेले काम इतरांपुढे येणं हे जास्त चांगलं आहे. दिवस आनंदी.

वृषभ- लांबच्या ठिकाणी पर्यटनाचे योग आहेत. अध्यात्म आणि पर्यटन या दोन्हीची सांगड घालण्याचा आज प्रयत्न कराल. नातवंडाकडून आनंदी क्षण अनुभवाल.आज देवी उपासना फलदायी ठरेल.

मिथुन - अचानक धनलाभाची आज शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल. सरकारी कामांमध्ये मात्र जपून पाऊल टाकावे. दिवस दगदगीचा राहील.

कर्क - कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. कामाचे स्वरूप वाढते राहील. भागीदाराचा योग्य सल्ला आज नफा वाढी मध्ये फायदेशीर ठरेल.

Horoscope Today
Vastu Tips: वारंवार घराच्या खिडकीवर कावळा येऊन बसतोय? काय आहेत संकेत? जाणून घ्या

सिंह - तब्येतीची विशेष काळजी घ्या.तुमच्याच मनस्थितीचा अंदाज तुम्हाला नीट येणार नाही. इतरांकडून अपमानाचे घोट आज पचवावे लागतील. आपल्या अहंकारावर अंकुश ठेवणं योग्य राहील.

कन्या - लॉटरी, रेस, शेअर्स यामध्ये विशेष फायदा दिसतो आहे. विष्णू उपासना फलदायी ठरेल. कलाकारांच्या कला बहरतील. दिवस आनंदी राहील.

तूळ - घरामध्ये नवीन गोष्टीची खरेदी होईल .घराच्या सजावटीमध्ये पैसा खर्च करण्याची इच्छा राहील. कुटुंबीयांचे मन जपाल. दिवस संमिश्र आहे.

Horoscope Today
Money Vastu Tips: या चुका केल्यास हातात टिकणार नाही पैसा

वृश्चिक - नवीन जबाबदारी अंगावर येईल .त्याचे तुम्ही स्वागतच कराल. तसेही तुमच्यामध्ये कर्तृत्वाच्या दृष्टीने अनेक उत्तम गुण आहेत. आज त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून पहा. स्वतःवर एक वेगळा विश्वास वाटेल.

धनु - गोडधोडाचे बेत आज दिवसभरात दिसत आहेत. पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लक्ष्मीची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे. दिवस समाधानी असेल.

मकर - कष्टाला बगल देऊन स्वतःसाठी जगण्याचा निश्चय घ्याल. मनमोकळेपणाने जगायला आवडेल कलंदर वृत्ती जागृत होईल आणि दिवस सुखाचा असेल.

Horoscope Today
Vastu Tips: स्वस्तिक बनवताना 'ही' काळजी घ्या अन्यथा....

कुंभ - परदेशगमनाचे योग आहेत किंवा अशा गोष्टींचे नियोजन कराल. मनामध्ये सुप्त राहिलेल्या गोष्टींकडे मन आकृष्ट होईल पण भावनेच्या भरात पैशाशी निगडित मोठे निर्णय नकोत.

मीन - कुटुंबीयांचा काही कारणामुळे रोष पत्करावा लागेल. एखाद्या गोष्टीचा लगेच फायदा होत नाही मात्र जुन्या केलेल्या गोष्टींचे गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. मन खंबीर ठेवून वाटचाल करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com