आजचे पंचांग
मंगळवार,१२ नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्लपक्ष,प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा.
तिथी-एकादशी १६|०५
रास- मीन
नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा ०७|५२
उत्तरा भाद्रपदा २९|४०
योग-हर्षण
करण- विष्टिकरण
दिनविशेष-१६ नं. चांगला
मेष - लांबचे प्रवास घडण्याचा आज योग आहे. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. विनाकारण चिडचिड, त्रास, कटकट यामुळे मनस्वास्थ खराब राहील.
वृषभ- सुना - जावयांच्या आदरमुळे मन भारावून जाईल. आपली रास तशीही कलात्मक आणि हौशी रास आहे. इतरांसाठी चार चांगल्या गोष्टी करण्यामध्ये आज रमून जाल.
मिथुन - बोलून गोड होता येतं हे तुमच्याकडून शिकावे. कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही आपल्यासाठी सारखेच आहेत हे तुमच्या वर्तनातून जाणवेल. सहकाऱ्यांच्या पाठिंबामुळे पुढे जाल.
कर्क- मनाचा हळवेपणा दरवेळी कामात येत नाही. आज काही गोष्टी आणि निर्णय खंबीरपणे घ्यावे लागतील. भाग्यचक्र आपल्या बाजूने कौल देईल. कार्तिकी एकादशी खास दिवस उपासनेसाठी आपल्याला पर्वणीच आहे.
सिंह - सरकारी कामांमध्ये अडथळे, अडचणी येण्याचा आजचा दिवस आहे. विनाकारण वाईट गोष्टींमध्ये अडकू नका. शब्दांची किंमत जाणून पुढे चला.
कन्या - विचारांचे वादळ आज घोंगावणारे असेल. आर या पार अशी परिस्थिती निर्माण होईल. पण आज मनाचा कौल घ्या. जोडीदार आणि भागीदार दोघांना आज महत्त्व दिले गेले पाहिजे.
तूळ - शुक्राच्या अमलाखाली येणारी आपली रास आज उगाचच कोणत्यातरी खाण्यापिण्याच्या गोष्टींचे लहर आल्यामुळे पोट दुखणे किंवा मौजमजेमुळे तब्येतीच्या तक्रारी वाढणार आहेत असे दिसते आहे.
वृश्चिक - राम प्रहरी देवाचे नाम घ्यावे हे जितके सत्य आहे. तितकेच सत्य तुमच्या राशीच्याबाबत प्रेमाची सत्यता आज आहे. आज थोडासा उनाड दिवस राहणार आहे. पण सर्व गोष्टी मनासारख्या तुम्ही करून घ्याल. एकादशी निमित्त विठ्ठलाची उपासना आज फलदायी ठरेल.
धनू - जपणे आणि जमवून घेणे या दोन्ही गोष्टी तुमच्या राशीला आज कराव्या लागतील. सहज गोष्टींच्या मागे लागा आणि अडचणींचा रस्ता आज टाळा. तर दिवस सुकर राहील.
मकर - श्रेयस आणि प्रेयस या दोघांमधील गोष्टींची योग्य निवड आज करता आली तर दिवस सुखाचा राहील. आपला पराक्रम हा क्षितिज पेलवणारा राहणार आहे.
कुंभ - आज तिखट तेलकट मसालेदार पदार्थ खावे अशी इच्छा होईल. कुटुंबीयांमध्ये किरकोळ कारणामुळे तुम्ही वाद घालाल. आपल्या जिभेवर दोन्ही प्रकारे नियंत्रण ठेवणं आज गरजेचे आहे.
मीन - शक्य असेल तेवढे आज स्वतःतच राहण्याचा प्रयत्न करा. इतरांचे करता करता पदरात मात्र काही पडत नाही. हे जाणवेल. आपल्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला जातो आज आत्ममग्न राहा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.