Horoscope Today : विष्णू उपासना फलदायी ठरेल, प्रवास जपूनच करा; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope In Marathi : आज २३ सप्टेंबर सोमवार आहे. सोमवारचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तर काही राशीच्या लोकांसाठी सामन्य राहणार आहे. वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope
Horoscope Today Marathi Saam tv
Published On

आजचे पंचाग

सोमवार,२३ सप्टेंबर २०२४,भाद्रपद कृष्णपक्ष,

सप्तमी श्राध्द.

तिथी-षष्ठी १३|५१ पर्यंत,नं सप्तमी

रास- वृषभ

नक्षत्र - रोहिणी

योग-सिध्दी

करण- वणिज

दिनविशेष- १४ प. चांगला

मेष - जसे जमेल तसे आज कुटुंबातील व्यक्तींच्या हिताचा विचार तुम्ही करणार आहात काही वेळेला पालथ्या घड्यावर पाणी असे व्हायला नको. केलेल्या गोष्टी तापटपणामुळे निघून जातील त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. वाणीवर संयम ठेवा.

वृषभ - कला, संगीत, मनोरंजन या गोष्टीत विशेष आवड वाटेल. स्वतःसाठी जगण्याची उर्मी दाटून येईल. स्वतः आनंदी रहाल. त्यामुळे इतरांना आनंद वाटेल.

मिथुन - काही गोष्टी स्वतःच्या सुखासाठी असतात. त्याचा आपण अर्थ कसा लावतो यावर सुख ठरते. आज बऱ्याच दिवसांनी स्वतःसाठी काही गोष्टींची खरेदी कराल. पण पैसे खर्च झाले या विषयाने मनस्ताप नको तर त्यातला आनंद शोधा.

कर्क - जुन्या गुंतवणुकीमधून फायदा होईल. घराशी निगडीत थोड्या त्रासाच्या गोष्टी होतील. पण ओळखीने याची कामे होतील. मोठ्या किंवा अधिकार पदावरच्या लोकांशी ओळख वाढेल.

सिंह - महत्वाचे काम करण्यावर आज भर द्या. ज्या गोष्टी पुढे करता येतील अशा नंतर करा. प्रवासाचे योग दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी बढतीची शक्यता आहे. आपल्या कामावर वरिष्ठ खूश होतील.

Horoscope
Horoscope Today : आजचा दिवस शुभ, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

कन्या - विष्णू उपासना विशेष फलदायी ठरेल. दानधर्म दानत आज विशेषत्वाने वाढीस लागेल. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग आहेत. दूरचे प्रवास घडतील. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.

तूळ - बऱ्याच ठिकाणी संयमाने पावले टाकावी लागतील. कधी कुठे झूकते माप येईल आणि इतरांच्या मुळे आपल्याला त्रास होईल याची कल्पनाही होणार नाही. आजच्या दिवशी सावधगिरीचा सल्ला आहे.

वृश्चिक - कोर्टटकचेरीच्या कामामध्ये यश मिळेल. योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक झाल्यामुळे व्यवसायामध्ये प्रगती दिसून येईल. आपल्या सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम राहील. निश्चिंत रहा.

धनु - आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. गहाळ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी त्रास संभवत आहेत.प्रवास जपूनच करा.

Horoscope
Chanakya Niti: या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत कधीही चुकत नाहीत, वाचा एका क्लिकवर...

मकर - संततीसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, प्रेमवीरांसाठी आजचा दिवस खूप छान आणि व्यस्त राहणार आहे. आपली कामे हेच आपले दैवत असे जाणवेल.

कुंभ - प्रॉपर्टीवरून काही गोष्टींमध्ये घरात चर्चा होईल. आपली दूध दुभती जनावर आणि त्यांच्या तब्येती सांभाळा. घरी नवीन जनावर घेण्याविषयी सुद्धा चर्चा होऊ शकेल. शेतीसाठी वाढीव योजना असतील तर आज कार्यान्वित होतील.

मीन - असे म्हणतात टॉप प्लेस इज ऑलवेज व्हेकंट. आपल्या बाबतीत असा आजचा दिवस आहे दिवसाच्या चढाओढीत कायम आपण अग्रेसर राहाल. यशाची कमान चढती राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com