Horoscope Today Marathi
Horoscope Today Marathi Saam tv

Horoscope Today : कुटुंबीयांविषयी प्रेम दाटून येईल, मनासारखा दिवस जाईल; तुमची रास आहे का यात?

Horoscope today 22 September 2024 : १२ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? जाणून घ्या राशीभविष्य.
Published on

आजचे पंचाग

रविवार,२२ सप्टेंबर २०२४,भाद्रपद कृष्णपक्ष,

पंचमी-षष्ठी श्राद्ध.

तिथी-पंचमी १५|४४ पर्यंत, नं षष्ठी

रास-वृषभ

नक्षत्र-कृत्तिका

योग- हर्षण ०८|१७ वज्रयोग २९|३७

करण-तैतिल

दिनविशेष-कृत्तिका वर्ज्य

मेष - आयुष्यात काही गोष्टी न ठरवता सहज होतात आज त्यातलाच एक दिवस आहे. सुवर्ण अलंकार सोने खरेदी किंवा मोठी गुंतवणूक याचे योग आज दिसत आहेत. धनाशी निगडित कामामध्ये सुयश मिळेल.

वृषभ - आपले व्यक्तिमत्व मुळातच उठावदार असते. लोकांना आपलेसे करून घेण्यातही तुम्ही माहीर आहात. बोलणे गोड असल्यामुळे सहज ओळख आणि परिचय वाढवू शकता. आज या सगळ्याच गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वात अजून भर टाकणार आहेत. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारे आत्मविश्वासाचा दिवस जाईल .

मिथुन- मनावर एक वेगळ्या प्रकारचे मळभ विनाकारण येते. आज काही जुन्या गोष्टी आठवून मनाला त्रास होईल. कशातच चित्त लागत नाही अशी अवस्था होईल. थोडे आपल्या बरोबरच्या लोकांच्यात उठबस ठेवा आणि विचार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा.

कर्क - स्वभावाचे गुण हे सगळीकडे येतातच. आपल्या चांगल्या स्वभावामुळे आपण अनेक नाती आणि भावबंध जोडलेले आहेत. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तुमचे एक प्रेमळ प्रतिमा आहे. आज याच गोष्टींमध्ये स्वतःचे मन रमेल आणि दिवस आनंदाचा जाईल.

Horoscope Today Marathi
Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

सिंह - कोणी काही म्हणा आपण आपला डामडौल आणि आपल्या तंद्रीत राहायला आपल्याला आवडते. याच गोष्टींचा फायदा कामाच्या ठिकाणी होईल. समाजकारणाने राजकारणामध्ये यश मिळण्याचा आजचा दिवस आहे.

कन्या- भाग्यकारक घटना घडतील. शिवाची विशेष कृपा आपल्यावर राहील. विनासायास आणि मनाप्रमाणे गोष्टी घडण्याचा आजचा दिवस आहे.

तूळ- शारीरिक मेहनत आणि कष्ट ही राहणारच आहे. पण तरीसुद्धा व्यापार व्यवसायामध्ये प्रगती होण्याआधीच्या काही अडचणी आज पार कराव्या लागतील. सर्व गोष्टींचा विचार करून फायदा समोर ठेवा. मात्र कुठल्याही वाईट गोष्टींचा चुकीचा प्रयत्न करू नका.

वृश्चिक- जोडीदाराचे हट्ट पुरवठा पुरवताना आपल्याला नाकी नऊ येते. पण काही वेळेला वेळेअभावी त्या गोष्टी होत नाहीत. पण आज या आनंदात साखर पडणार आहे. एकमेकांसाठी वेळ काढाल. व्यवसायाच्या वृद्धीसाठी असणाऱ्या काही चांगल्या गोष्टी कानावर येतील आणि जोमाने कामाला लागाल.

Horoscope Today Marathi
Chanakya Niti : सकाळी उठून फक्त 'हे' एक काम करा, आयुष्यात कधीच राहणार नाही रिकामी खिसा

धनु - आपण मेहनत कष्ट याला आपण कधी घाबरत नाही. पण शरीर स्वास्थ जर नीट नसेल तर ह्या गोष्टी तितक्या सहज आणि सुलभ होत नाहीत. आज तब्येतीची कुरबुर आहे मानसिक ताण आणि त्रास सुद्धा संभवतो आहे.

मकर- प्रेमाच्या कक्षा वृंदावणार आहेत. आपले प्रेम म्हणजे खूप वेळेला अबोल प्रीती असते पण आज त्यामध्ये गुलाबी रंग भरले जाणार आहेत. दिवस चांगला जाईल मनाप्रमाणे घटना घडतील.

कुंभ - घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्य होण्याची दाट शक्यता दिसते आहे. कुटुंबीयांविषयी प्रेम दाटून येईल सुखासीन वृत्तीकडे आज कल आहे.दिवस चांगला जाईल.

मीन - प्रगतीसाठी नवे जग खुणावते आहे हे आपल्याला जाणवेल. एकापेक्षा अनेक व्यवसाय करण्याचा मनात विचार असेल तर आज कुठेतरी नव्याने पायाभरणी करा. छोटे प्रवास होण्याचा योग आज दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com