Thursday Horoscope : कामात संयम ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींवर राहणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : 12 राशींच्या व्यक्तींचा गुरुवारचा संपूर्ण दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा खास राशीभविष्य.
Thursday Horoscope
Thursday Horoscopemeta ai
Published On

मेष : आज घरातले वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता असून, नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करण्याची संधी मिळू शकते.

वृषभ : आज नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ मिळू शकतो आणि फॅमिलीतले वातावरण सुखद राहील. खर्चावर नियंत्रण ठेवल्याने बचत होईल.

मिथुन : पैसा खर्च करताना संयम ठेवा. कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. कामात शिस्त ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा. जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल.

कर्क : करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नवीन कामांना गती मिळेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मित्र व सहकाऱ्यांची साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. नियोजनानुसार काम पूर्ण होईल.

सिंह : आज कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळेल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Thursday Horoscope
Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

कन्या : भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक कामे यशस्वी होतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रवासाचेही योग आहेत.

तुळ : आज कोणतेही काम घाईने करू नका. कुटुंबातील सदस्यांच्या मताला महत्त्व द्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. संयम ठेवल्यास दिवस चांगला जाईल.

वृश्चिक : भागीदारीत केलेल्या कामांमध्ये यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल आणि सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

धनु : कामात मेहनत आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. निर्णय घेताना घाई करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक लोभ टाळा. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.

मकर : मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. स्पर्धात्मक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. सर्जनशील कामात प्रगती होईल. आर्थिक लाभाची शक्यता असून मनोरंजनाचेही योग आहेत.

Thursday Horoscope
Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

कुंभ : कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा आणि भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. संयम ठेवा.

मीन : सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि प्रवासाची शक्यता आहे. धाडसाने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com