Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Ex partner return astrology: प्रेमसंबंधात ब्रेकअप होणं आणि नंतर Ex-Partner चं पुन्हा आयुष्यात परत येणं, ही एक सामान्य पण गुंतागुंतीची परिस्थिती आहे. अशा वेळी मनात अनेक प्रश्न उभे राहतात, तो का परत येतोय? त्याची खरी योजना काय आहे?
Ex plan by zodiac sign
Ex plan by zodiac signsaam tv
Published On

ब्रेकअप म्हणजे एक गोंधळलेली, गुंतागुंतीची गोष्ट. या ब्रेकअपमधून जेव्हा तुम्ही तुम्ही थोडफार सावरायला लागता, तेवढ्यात एक जुना मेसेज, एखादा मीम, किंवा “हे पाहिलं आणि तू आठवलीस” असा मेसेज येतो. ही काही अचानक घडलेली गोष्ट नसते. हा तर तुमच्या एक्सचा राशीवर आधारित प्लॅन असतो.

आज आपण जाणून घेऊया की, तुमचा एक्स तुमच्यावर कोणत्या पद्धतीने परत इम्प्रेशन टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या राशीच्या स्वभावानुसार हे आज जाणून घेऊया.

फायर साईन्स – मेष (Aries), सिंह (Leo), धनु (Sagittarius)

फायर साईन्स कधीही हात जोडून परत येत नाहीत. ते थेट काहीतरी धमाकेदार करून लक्ष वेधून घेतात.

  • मेष तर अगदी डायरेक्ट असतो. तो कधीही तुझ्या दरवाज्यात तिकीटं घेऊन उभा राहील आणि बोलेल, “चल, कॉन्सर्टला जाऊ, ब्रेकअप तर थोडा ब्रेकच होता ना?”

  • सिंहचा इगो वेगळाच गेम खेळतो. तो सोशल मीडियावर थर्स्ट ट्रॅप फोटो पोस्ट करतो, फुल ऑन पार्टी मूड दाखवतो, पण आतून फक्त तुझ्या reply ची वाट पाहतो.

  • धनुचा आत्मविश्वास इतका गोड असतो की त्याचं ‘road trip’चं इन्व्हिटेशन म्हणजे “आपण काही ब्रेक झालोच नव्हतो” असं फील करतो.

Ex plan by zodiac sign
Shani Vakri: जुलै महिन्यात शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींना मिळणार धनलाभ, भरभराटही होणार

अर्थ साईन्स – वृषभ , कन्या, मकर

या तिन्ही राशींचे लोक वेगळ्याच पद्धतीने परत येतात.

  • वृषभ राशींच्या व्यक्ती तुम्हाला आवडेल ते जुने आवडते चॉकलेट पाठवतील. सोबत एक छोटं “ते दिवस आठवले” असं नोट. शांतपणे आठवणी खेळवतो.

  • कन्या म्हणजे प्लॅनर. तो तुम्हाला सॉरी म्हणून पॉईंट-टू-पॉईंट माफीनामा मेल करेल, अगदी प्रेझेंटेशन स्टाईलमध्ये!

  • मकर हे तर मास्टर माइंड. ते चुकून तुमच्या फेव्हरेट कॅफेमध्ये भेटतील, परफेक्ट लुकमध्ये. अनायासे भेट, पण पूर्ण तयारीने.

एअर साईन्स – मिथुन, तुला, कुंभ

या राशींच्या व्यक्ती गप्पांमधून मन जिंकणारे असतात. हे लोक शब्दांनी जाळं विणतात. त्यांचं कमबॅक हे तुमच्या बोलण्यातून सुरू होतं.

  • मिथुन राशीच्या व्यक्ती आधी एखादा फनी मीम पाठवेल, मग अचानक एखादी आठवण आणि शेवटी “ती संध्याकाळ आठवते का?” असं विचारून मन हलकं हलकं भूतकाळात खेचेल.

  • तूळ रास तुला फक्त “मित्र म्हणून भेटूया” असं सांगेल, पण त्याचं हसणं, बोलणं, आणि नजर सगळं तुझं मन पुन्हा जिंकण्यासाठी असेल.

  • कुंभ राशीच्या व्यक्ती थेट फिलॉसॉफिकल मेसेज पाठवेल “आपण जे काही शिकलो, ते आपल्याला एकत्र येण्यासाठीच होतं” असं काहीतरी बोलून तुम्हाला गोंधळवेल.

Ex plan by zodiac sign
Shani Vakri: श्रावणापूर्वी न्यायाधीश शनी होणार वक्री; 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर, आर्थिक अडचणीही येणार

वॉटर साईन्स – कर्क, वृश्चिक, मीन

  • कर्क राशीच्या व्यक्ती तुमच्यासाठी जुने आवडते बिस्किट्स बनवून आणतील. डोळ्यांत थोडेसे अश्रू आणि तोंडात वाक्य “मी बदललोय खरंच.”

  • मीन राशींच्या व्यक्ती कविता लिहतील किंवा अश्रूंनी भरलेला व्हॉइस नोट पाठवतील. तुमच्या ड्रीम्सबद्दल, जे तुम्ही दोघांनी एकत्र पाहिले होते.

  • वृश्चिक राशींच्या व्यक्ती म्युझिकची प्लेलिस्ट पाठवतो, आणि मध्यरात्री “मी अजून विसरू शकलो नाही” अशा स्वरात मेसेज टाकतील.

Ex plan by zodiac sign
Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com