Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Friday miraculous remedies: हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. शुक्रवार हा धन, वैभव आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र यांना समर्पित आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास देवी लक्ष्मी आणि शुक्र देव प्रसन्न होतात
Friday Remedies To Get money
Friday Remedies To Get moneysaam tv
Published On

शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी काही सोपे केले तरी प्आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. ज्यांना नोकरीत अडचणी आहेत, पैशाची चणचण आहे, किंवा आयुष्यात यश मिळवायचं आहे, त्यांनी जर हे उपाय केले तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच सराकारात्मक बदल घडू शकतात. हे उपाय कोणते आहे ते पाहूयात.

इच्छा पूर्ण होण्यासाठी

जर तुमची एखादी इच्छा खूप काळापासून अपूर्ण राहिली असेल, तर शुक्रवारच्या दिवशी ११ पिंपळाची पानं घेऊन हनुमान मंदिरात जा. यावेळी हनुमानजींच्या पायाकडील सिंदूर घ्या आणि त्या प्रत्येक पानावर एक-एक करून तिलक लावा. प्रत्येक वेळेस तिलक करताना तुमची तीच इच्छा मनात ठसठशीतपणे म्हणा. सर्व पानं तिलक केल्यावर ती हनुमानजींना अर्पण करा.

सौभाग्य वाढवण्यासाठी उपाय

तुमचं नशीब फळफळण्यासाठी शुक्रवारी एक रुपयाचं नाणं घ्या आणि ते तुमच्या घरातील पूजास्थळी देवी लक्ष्मीसमोर ठेवा. प्रथम लक्ष्मीमातेची नीट पूजा करा, आणि त्यानंतर त्या नाण्याची सुद्धा पूजा करा. ते नाणं दिवसभर मंदिरातच ठेवावं. दुसऱ्या दिवशी ते नाणं एका लाल कपड्यात गुंडाळून नेहमी आपल्या जवळ ठेवा.

कामात यश मिळण्यासाठी

तुमच्या कामात उत्साह आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी, शुक्रवारी एका लाल कपड्यात थोडी मसूर डाळ बांधा. यानंतर ही बांधलेली डाळ हनुमान मंदिरात दान करा. हा उपाय तुमचं मनोबल आणि कार्यक्षमता वाढवतो.

भाऊ-बहिणींचं सहकार्य मिळवण्यासाठी उपाय

जर तुमच्या घरात भावा-बहि‍णींमध्ये कलह असतील तर हा उपाय तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमच्या कामात भाऊ किंवा भावासारख्या व्यक्तींचा पाठिंबा हवा असेल, तर शुक्रवारी मंदिरात जाऊन साखर दान करा. हा उपाय तुमचं नातं सुधारतो आणि सहकार्य वाढवतो.

Friday Remedies To Get money
Guru-Shani transit: 500 वर्षांनंतर श्रावणात बनणार शनी-गुरुचा दुर्लभ संयोग; 'या' 3 राशींचे येणार अच्छे दिन

आयुष्यात आनंद वाढवण्यासाठी उपाय

शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर देवी लक्ष्मीसमोर उभं राहा, हात जोडून प्रणाम करा. उजव्या हातात फूल घ्या आणि ते देवीसमोर ठेवा. त्याच फुलावर एक मातीचा दिवा ठेवा, त्यात तूप भरा, वाती लावा आणि दिवा प्रज्वलित करा. त्यासोबतच देवीला लाल ओढणी अर्पण करा. हा उपाय तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येतो.

घरात शांतता टिकवण्यासाठी उपाय

तुमच्या आजूबाजूला शांतता नांदावी असं वाटत असेल, तर शुक्रवारी हनुमान मंदिरात जाऊन देवासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. त्यानंतर त्यांच्या उजव्या पायातील सिंदूर कपाळावर तिलक म्हणून लावा. हा उपाय तुमच्या सभोवतालचा नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात शांतता प्रस्थापित करतो.

Friday Remedies To Get money
Shani Vakri: श्रावणापूर्वी न्यायाधीश शनी होणार वक्री; 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर, आर्थिक अडचणीही येणार

वैवाहिक जीवनात अडथळे दूर करण्यासाठी उपाय

तुमच्या वैवाहिक नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे त्रास होत असेल, तर शुक्रवारी एक मूठ मसूर डाळ घ्या आणि ती तुमच्या जोडीदाराच्या हाताने सात वेळा स्पर्श करा. त्यानंतर ती डाळ स्वच्छ वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय नात्यातील गैरसमज, अडथळे दूर करण्यास मदत करतो.

Friday Remedies To Get money
Kendra Trikon Rajyog: शनी देव बनवणार पॉवरफुल केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com