

दिवाळी संपताच काही राशींची चांदी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. मंगळ ग्रहाला धैर्य, ऊर्जा, आत्मविश्वास, जमीन, मालमत्ता आणि नेतृत्वाचा कारक मानले जाते. लवकरच मंगळदेव सिंह राशीत प्रवेश करेल. या गोचराचा काही राशींना विशेष फायदा होऊ शकतो.
विशेष म्हणजेच मेष, मिथून, सिंह, तूळ, वृश्चिक, धनु आणि मीन या ७ राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात नवीन संधी आणि आर्थिक लाभाचे योग निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशींना काय फायदा होईल.
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर पाचव्या भावात होणार आहे. त्यामुळे शिक्षण, करिअर आणि कला क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घेता येईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ तिसऱ्या भावात गोचर करेल. त्यामुळे आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. नोकरीतही स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते.
सिंह राशीतच मंगळाचे गोचर होणार असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतील. मात्र, राग आणि घाईवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ अकराव्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ दहाव्या भावात गोचर करेल. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ नवव्या भावात गोचर करेल. उच्च शिक्षण, परदेश प्रवास आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरू शकतो. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळ सहाव्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे नोकरी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
महत्त्वाची सूचना: ज्योतिषशास्त्रातील हे अंदाज पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. प्रत्यक्ष आर्थिक लाभ, करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यातील परिणामांची हमी देता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.