

फेब्रुवारी 2026 मध्ये सूर्याचं बॅक-टू-बॅक तीन वेळा संक्रमण
श्रवण, धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश
सूर्य कुंभ राशीत गेल्याने मोठे सकारात्मक बदल
ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहांचा राजा सूर्य ग्रह चाल बदलणार आहे. सूर्याच्या या बदलत्या परिवर्तनाने अनेक राशींच्या जीवनात नवीन संधी निर्माण होत असते. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. फेब्रुवारी महिन्यात सूर्य श्रवण नक्षत्रातून निघून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. काही काळानंतर सूर्य शनिच्या कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तसेच 19 फेब्रुवारी रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल.
सूर्याचं अशा पद्धतीने वारंवर नक्षत्र आणि राशी परिवर्तन सामान्य नसेल. याच कारणामुळे फेब्रुवारी महिन्याचा हा काळ करिअर, धनसंपत्ती आणि आत्मविश्वासाशी संबंधित बाबतीत अनेक राशींसाठी खास असेल. या काळात काही राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ.
फेब्रुवारी महिन्यात सूर्याची चाल बदलामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे. यामुळे त्यांच्या कामाला चांगली गती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं कौतुक केलं जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. नोकरीत तुमच्या मनाप्रमाणे पोस्ट मिळेल. तसेच, तुमची निर्णयक्षमता चांगली दिसून येईल.
सूर्य ग्रहाच्या संक्रमणाचा प्रभाव वृषभ राशीवर दिसून येणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. नवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. मित्रांचा देखील चांगला सपोर्ट मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळण्याची संधी आहे.
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. याामुळे हा महिना या राशींसाठी फार खास असेन. या काळात प्रगतीची अनेक दारं खुली होतील. काहींचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आरोग्य देखील उत्तम असेन. झोप पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नात्यातील दुरावा देखील दूर होईल.
या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप काही शिकवणारा असेन. या काळात तुमच्या मुलांची नेतृत्वक्षमता दिसून येईल. नात्यात गोडवा निर्माण होईल. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. व्यवसायाचा विस्तार होईल.
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणाने धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ असेन. तसेच नेतृत्वक्षमता चांगली होईल. भावा-बहिणीच्या नात्यातील दुरावा नष्ट होईल. महत्त्वाची कामे वेळेत पार पडतील. अनेक महत्त्वाच्या योजना पार पडतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.