Numerology: 'हा' मुलांक असलेल्या लोकांचं वयाच्या ३५ व्या वर्षानंतर नशीब पालटत; शनिदेवाचा मिळतो आशीर्वाद

Numerology Secret: अंकशास्त्रानुसार असे काही मुलांक आहेत ज्यांना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो, परंतु वयाच्या ३५ व्या वर्षानंतर त्यांना शनीच्या आशीर्वादामुळे यश मिळत असतं.
Numerology Secret
Rescue teams at the accident site in Doda district after an Indian Army vehicle plunged into a deep gorge.saam tv
Published On
Summary
  • काही मुलांक असलेल्या लोकांना सुरुवातीला संघर्ष करावा लागतो

  • आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो

  • वयाच्या 35 नंतर परिस्थिती हळूहळू बदलते

आपल्या परिचयातील असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच कठोर मेहनत करत होते. हलाकीचं जीवन जगत होते. बऱ्याचवेळा त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु काही काळानंतर त्यांची परिस्थिती पूर्ण बदलते. त्यांच्यासाठी एकेकाळी स्वप्न असलेले सर्व काही त्यांना वास्तवात मिळत असते. अंकशास्त्रात असे अनेक मुलांक आहेत, ज्यांना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. पण वयाच्या ३५ व्या वर्षांनंतर परिस्थिती सुधारते आणि शनीच्या आशीर्वादाने त्यांना सुवर्ण यश मिळत असते.

Numerology Secret
Numerology Lucky Women: या तारखांना जन्मलेल्या महिला असतात लकी; नवऱ्याच्या आयुष्यात आणतात सूख, धन अन् प्रसिद्धी

अंकशास्त्रात८ हा मुलांक शनीला खूप प्रिय असतो. कोणत्याही महिन्याच्या ८,१७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्यांचा मुलांक ८ असतो. या व्यक्तींचे सुरुवातीचे आयुष्य सोपे नसते. यशासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. दरम्यान असे मानले जाते की या मुलांकाचे लोक वयाच्या ३५ व्या वर्षी पोहोचल्यानंतर मोठं यश मिळवतात. ज्योतिषशास्त्रात शनी हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. आणि शनिदेव हे मुलांक आठचे स्वामी ग्रह आहेत. या मुलांकात जन्मलेल्यांना त्यांच्या कुंडलीत यश मिळविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

हे लोक आयुष्यात बरीच प्रसिद्धी आणि संपत्ती कमावतात, असं म्हटलं जातं. अंकशास्त्रानुसार, ८ मुलाक असलेल्या लोकांचे सुरुवातीचे आयुष्य आव्हाने आणि संघर्षांनी भरलेले असते. शनिदेव त्यांना लहानपणीच शिस्त आणि संयम शिकवतात. ८ मुलांक असलेल्या लोकांना सहजासहजी काहीच मिळत नाही. मग ते अभ्यास असो किंवा करिअर. कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी त्यांना इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते.

Numerology Secret
Horoscope: अमावस्येनंतर सुरू झालाय ५ राशींचा 'गोल्डन टाइम'; नशीब पालटणार, धनलाभासह करिअरमध्ये होणार प्रगती

अंकशास्त्रानुसार ८ मुलांकाचे लोक स्वभावाने शांत आणि गंभीर असतात, ज्यामुळे त्यांना कधीकधी अहंकारी मानले जाते, परंतु प्रत्यक्षात ते उलट असतात. ते त्यांच्या भावना सांगणे टाळतात, म्हणूनच त्यांचे मित्र कमी असतात. हे लोक शांत वृत्तीने त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत असतात. अंकशास्त्रानुसार ८ मुलांक असलेले लोक खूप संयमी असतात, जे त्यांना कठीण परिस्थितीतही हार मानू देत नाहीत.

याच कारणामुळे हे लोक कालांतराने इतके यश मिळवतात की कोणीही कल्पनाही करू शकत नाही. ज्यांचा मुलांक ८ अंक आहे, त्यांच्यासाठी ३५ ते ३६ हे वय त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवून आणतात. या टप्प्यावर, शनिदेव त्यांना सुवर्ण यश मिळवून देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com