Horoscope: अमावस्येनंतर सुरू झालाय ५ राशींचा 'गोल्डन टाइम'; नशीब पालटणार, धनलाभासह करिअरमध्ये होणार प्रगती

Panchgrahi Rajyog: मौनी अमावस्येनंतर, पंचग्रही राजयोग तयार झालाय. यामुळे ५ राशींच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशी भाग्यवान आहेत ते जाणून घेऊ.
Horoscope
Astrological chart highlighting Panchgrahi Rajyog formed after Mauni Amavasya bringing fortune for 5 zodiac signs.saam tv
Published On
Summary
  • मौनी अमावस्येनंतर पंचग्रही राजयोगाची निर्मिती

  • ५ राशींसाठी सुरू झाला भाग्योदयाचा काळ

  • धनलाभ आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याचे संकेत

मौनी अमावस्या रविवारी झाली असून या अमावस्येनंतर ५ राशींच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. कारण शनीच्या मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र या पाच ग्रहांची युती होऊन 'पंचग्रही राजयोग' निर्माण झालाय. या महायोगामुळे अमावस्येनंतर आता ५ राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचा काळ सुरू झालाय. या काळात राशींना डबल लाभ होणार आहे.यात धनलाभासह करिअरमध्ये प्रगती साधता येणार आहे. ज्या राशींचे नशीब पालटणार त्या राशी कोणत्या हे जाणून घेऊ.

मेष

मौनी अमावस्येनंतर मेष राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरमध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. आर्थिक चणचण होऊन धनलाभ होण्याचे योग आहेत. अडकलेली कामे मार्गी लागतील.

Horoscope
Numerology Lucky Women: या तारखांना जन्मलेल्या महिला असतात लकी; नवऱ्याच्या आयुष्यात आणतात सूख, धन अन् प्रसिद्धी

मिथुन

या राशीसाठी माघ महिना यशाची दारे उघडणारा ठरणार आहे. बुध आणि मंगळाच्या युतीचा मोठा फायदा या राशीच्या जातकांना होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर त्यावर निर्णय पक्का करा. काहींना नव्या नामांकित कंपनीतून ऑफर मिळू शकते. परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope
Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

कन्या

या राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थिरता आणि आनंद आणणारा असेल. कौटुंबिक वाद मिटतील. घरातील वातावरण उत्साही राहील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग येण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे.

मकर

राशीत ग्रहांची युती असल्याने तुमचे नशीब पालटणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याचे योग्य आहेत.

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी माघ महिना लाभकारी ठरणार आहे. शनी आणि बुधाच्या प्रभावामुळे नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी दूर होत धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे गोड फळ मिळेल. आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com