Rashi Bhavishya : पैशांची आवक वाढेल, पुढे जाण्याचे मार्ग मिळतील; तुमच्या नशीबात आज काय लिहलंय? जाणून घ्या

Horoscope Today 12 May 2024: आजचे राशिभविष्य, १२ मे २०२४ : पैशांची आवक वाढेल, पुढे जाण्याचे मार्ग मिळतील; तुमच्या नशीबात आज काय लिहलंय? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
Horoscope today in marathi
Rashi Bhavishya Today 12th May 2024Saam TV

आजचे पंचांग १२ मे २०२४

वार - तिथी - शु.पंचमी. नक्षत्र - आर्द्रा. योग - धृती करण - बव रास - मिथुन २९.०५ नंतर कर्क. आद्य शंकराचार्य जयंती. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : दिवस आनंदी जाईल

शेजारी सख्य राहील. वेळेला ते मदतीला येतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार असतील तर ते मार्गी लागतील. दिवस चांगला. आनंदी जाईल.

वृषभ : अचानक पैशाची आवक वाढेल

अचानक पैशाची आवक वाढेल. व्यवसायामध्ये वाढ होईल त्यामुळे पैशाशी निगडित व्यवहार सुद्धा मार्गी लागतील.

मिथुन : पुढे जाण्याचे मार्ग मिळतील

मानसिक स्वास्थ चांगलं राहील. जे काम घ्याल त्यामध्ये यश आज मिळणार आहे. सकारात्मकता वाढेल. काही संशोधक गोष्टींनी पुढे जाण्याचे मार्ग मिळतील.

कर्क : जीव ओतून काम करावे लागेल

जीव ओतून काम करावे लागेल. पण त्यातून मन:शांती काही दिसत नाही. म्हणूनच शांत रहा आणि स्वस्थ व्हा.

सिंह : मित्र-मैत्रिणींशी सौहार्दाने वागाल

प्रेमाने जग जिंकता येते. म्हणूनच आपले सहकारी नातेवाईक शेजारी मित्र मंडळ मैत्रिणी यांच्याशी सौहार्दाने वागाल. काही वेळेला आपला वरचढपणा असला तरी तो आज दिसून येणार नाही.

कन्या : चांगल्या गोष्टी सामोर येतील

राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासाला निघाला असाल तर त्यामधून अनेक चांगल्या गोष्टी सामोर येतील. उगाचच भिन्नलिंगी व्यक्ती यांबद्दल आकर्षण वाटेल.

Horoscope today in marathi
Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

तूळ : संतती विषयी उगाच चिंता नको

आपल्यामध्ये वैचारिक परिवर्तनाचे दिवस येत आहेत. मुळात वायुतत्त्वाची रास विचार करूनच आज निर्णय घ्याल. संतती विषयी उगाच चिंता नको.

वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

टाईम इज मनी हे लक्षात ठेवा. वेळ हाच आजकाल पैसा असतो आणि म्हणून दोन्ही वर काम करा. वेळ आणि पैसा वाया जाण्याचा आजचा दिवस. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनु : नव्या गोष्टींची आखणी बांधाल

व्यवसायात आज तुमचा प्रभाव राहील. नव्या गोष्टींची आखणी बांधाल. जोडीदाराकडून समजूतदारपणाचे प्रस्ताव आज येतील.

मकर : कामे रखडण्याची शक्यता

आरोग्य धनसंपदा. आज याच गोष्टींवर लक्ष द्या. दैनंदिन कामांमध्ये सुद्धा अडचणी व ती कामे रखडण्याची शक्यता दिसते आहे.

कुंभ : धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल

सद्गुरूंची विशेष उपासना करा. धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. त्यातूनच सात्विक आनंद मिळेल.

मीन : वरिष्ठ कामाचे कौतुक करतील

कार्यक्षेत्राचे कुंपण वाढणार आहे. वरिष्ठ सुद्धा आपण केलेल्या कामाचे कौतुक करतील. अर्थात पुढे असणाऱ्या गोष्टींसाठी आज आपले पाय जमिनीवर असणे गरजेचे आहे.

Horoscope today in marathi
Rashi Bhavishya: मेष ते मीन राशीच्या नशिबात आज काय लिहलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com