Rashi Bhavishya: मेष ते मीन राशीच्या नशिबात आज काय लिहलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Horoscope Today 11 May 2024: आजचे राशिभविष्य, ११ मे २०२४ : मेष ते मीन राशीच्या नशिबात आज काय लिहलंय?, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
Horoscope today in marathi
Rashi Bhavishya Today 11th May 2024Saam TV
Published On

दैनिक पंचांग ११ मे २०२४

वार - शनिवार तिथी - शु.चतुर्थी नक्षत्र - मृग योग - सुकर्मा. करण - वणिज. रास - मिथुन. विनायक चतुर्थी. दिनविशेष -१४ प. चांगला.

मेष : आजचा दिवस वर्दळीचा राहील

आजचा दिवस वर्दळीचा राहील. नवीन काही गोष्टी शिकणे, आधुनिक युगासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी वापरणे, याकडे कल राहील. नवनिर्मितीचा आनंद लाभेल. गणेश उपासना या दिवशी.

वृषभ : काम करा कष्ट करा

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" ही जाणीव ठेवा. काम करा कष्ट करा. पैसा सहज आपल्याला उपलब्ध होईल. येणारा पैसा योग्य ठिकाणी खर्च करा.

मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल.

मी कशाला आरशात पाहू ग! मी कशाला बंधनात राहू ग! असा आजचा दिवस. आपल्या आपल्यात रहाल. मनमौज करण्यासाठी आजचा दिवस चांगला.

कर्क : गोष्टी सावधगिरीने हाताळा

काही वेळेला उगाचच अडकल्यासारखे होते. मग कारण काही असो घरच्यांचा धाक किंवा जवळचे लोक उगाचच आपल्याला बंधनात ठेवतात की काय अशी भावना होते. तो आजचा दिवस आणि म्हणून गोष्टी सावधगिरीने हाताळा. आज कर्ज फेडावे.

सिंह : नवीन कल्पना मनात येतील

कामासाठी अचानक नवीन कल्पना मनात येतील आणि त्याप्रमाणे अंमल होईल. कामे सुकर होतील आणि म्हणूनच पावले उचला आणि कामाला लागा.

कन्या : यशाची पायवाट मिळेल

धावपळ दगदग होईल पण अर्थात तो कामाचा एक भाग असेल याच कामामुळे तुम्हाला यशाची पायवाट मिळेल. वडिलांचे सहकार्य लाभेल.

तूळ : एकाच वेळी अनेक गोष्टी कराल

समुद्राप्रमाणे अमर्याद ताकत आज आल्यासारखी वाटेल. काय करावे काय करू नये असा संभ्रम राहील. देवाच्या कृपेमुळे अनेक गोष्टी एकाच वेळी कराल आणि त्यात नक्की यश मिळेल.

वृश्चिक : दत्त उपासना करावी

आज उगाचच भयावह गोष्टी मनात येतील मृत्यू काय? किंवा गुढ गोष्टींकडे ओढा राहील. विनाकारण दडपण आणि भीती या गोष्टीने मन ग्रासले जाईल. दत्त उपासना करावी.

धनु : तारेवरची कसरत होईल

"इकडे आड तिकडे विहीर" अशी आज परिस्थिती आहे. सर्व ठिकाणाहून सोन्याचा संधी येत आहेत. नक्की कोणती घेऊ घरी आणि व्यवसायात दोन्हीकडे काम करताना तारेवरची कसरत होईल.

मकर : वस्तू जिन्नस जपून ठेवा

मामाकडे, आजोळी काहीतरी वार्तालाप होण्याची शक्यता. आपल्या वस्तू जिन्नस जपून ठेवा. गहाळ होऊ शकतात. तब्येत जपा.

कुंभ : उपासनेमध्ये दिवस घालवा

मिळणाऱ्या गोष्टीत समाधान माना. उपासनेमध्ये दिवस घालवा. आराधने मध्ये ताकत आहे हे लक्षात राहू दे. पुढील गोष्टींसाठी पायाभरणी आज होईल.

मीन : घर वा गाडी घेण्याचे बेत आखाल

घर वा गाडी घेण्याचे बेत आखाल. घरामध्ये वाईटपणा घेऊन सुद्धा काम नेटाने करावे लागेल. मनःशांती हरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com