Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

Taurus Personality : वृषभ म्हणजे बैल. बैलासारखे कष्टही करतील आणि तरीसुद्धा स्वतःला छान मेंटेन करतील. आणि म्हणून वृषभेचे लोक सर्वांना हवेहवेसे वाटतात.
Vrishabh Rashi Personality
Vrishabh Rashi PersonalitySaam TV

राशी स्वामी शुक्र. स्थिर व अर्थ तत्वाची रास. धनस्थानाशी निगडित असणारी रास. मुळामध्येच पैसे मिळवणे आणि खर्च करणे या दोन गोष्टी आपल्याला लीलया जमतात. वृषभ म्हणजे बैल. बैलासारखे कष्टही करतील आणि तरीसुद्धा स्वतःला छान मेंटेन करतील. आणि म्हणून वृषभेचे लोक सर्वांना हवेहवेसे वाटतात.

मनाचा कारक चंद्र या राशीत सुखावतो. एकनिष्ठ, प्रेमळ, विनोदी सचोटीने काम करतात, काही वेळेला कामांमध्ये धीमे पण असतो पण पद्धतशीर आणि व्यवस्थित काम करू शकतात.

Vrishabh Rashi Personality
Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

सातत्याने कामात राहणे यांचे गुण. नियम पाळणे आवडते. एकूणच कलाकुसर प्रिय, पैसे खर्च करणे, छान राहणीमान, गोड बोलणे या गोष्टींमुळे स्वतः आनंदात राहून इतरांना आनंद देणारी ही रास.

काही वेळेला हट्टीपणा विचित्र हौस, त्याचबरोबर आळस, मठ्ठपणा या गोष्टी आपल्याकडे येतात. म्हणूनच विशेषत्वाने देवी उपासना आपण करावी. त्याचा नक्की फायदा होईल. आपल्या राशीचा अंमल कंठावर आहे.

त्यामुळे घशाशी निगडित आजार, डोळ्याचे आजार, त्याचबरोबर विचित्र खाण्यापिण्याचे सवयी यामुळे होणारे त्रास, अति आधुनिक राहणीमान किंवा खूप खाण्याच्या सवयी यामुळे पोटाचे आजार आपल्याला होऊ शकतात. खाण्या पिण्यावर कंट्रोल ठेवल्यास तब्येत चांगली राहील.

Vrishabh Rashi Personality
Rashi Bhavishya : पैशांची आवक वाढेल, पुढे जाण्याचे मार्ग मिळतील; तुमच्या नशीबात आज काय लिहलंय? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com