Veen Doghatli Hi Tutena: झी मराठीवरील लोकप्रिय मालिके ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये लवकरच एक रोमँटिक आणि भावनिक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात समर आणि स्वानंदी या मुख्य पात्रांमध्ये प्रेमाची गोड सफर सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे.
या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे त्यांच्या केमिस्ट्रीमुळे दर्शकांची उत्सुकता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी मालिका सुरू झाली असून आतापर्यंत समर आणि स्वानंदीची कहाणीने अनेक वळणं घेतली आहेत. ज्यात त्यांच्या कुटुंबीयांवरील प्रेम यावर भर दिला गेला आहे.
आताचा प्रोमो पाहता, स्वानंदी ऑफिसकडे चालत असताना समर तिच्या जवळून गाडीने जातो. आनंद आणि निकीता सारख्या पात्रांच्या छोट्या प्रसंगांमुळे हा क्षण आणखी आकर्षक दिसतो, आणि समर स्वानंदीला ऑफिसला सोडण्यासाठी गाडीवर बोलावतो, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील जवळीक वाढण्याची शक्यता उभी राहते.
मालिकेतील ट्विस्टमध्ये समर आणि स्वानंदी यांच्यातील गैरसमज व कुरबुरी यांच्यामध्ये आता गोड भावनिक क्षण सुरु होणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमकथेचा पुढचा भाग कसा असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हे वळण नात्याला अधिक मजबूती देईल का, की आणखी काही अडचणी येतील, हे भविष्यातील भागांमध्ये स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.