Veen Doghatli Hi Tutena Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका "वीण दोघांतली ही तुटेना" प्रेक्षकांच्या मनात चांगलीच घर करून आहे. मालिकेच्या कथानकात सतत नवे वळण येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसते. स्वानंदी आणि समरची आधी भेट झाली असून त्यांच्या भेटीमुळे चाहते खूश झाले होते.
सध्या कथानकात स्वानंदी आणि समरची भेट पुन्हा घडली आहे. पहिल्या भेटीत भांडणारे हे दोघे आता एकमेकांचं काय भविष्य असेल. नियती त्यांना वारंवार आमनेसामने आणत आहे. यावेळी दोघांच्या भेटीत प्रेम किंवा गोडीपेक्षा गैरसमज, राग आणि तणावाची भावना अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात पुढे काय घडणार, याबाबत प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.
दुसरीकडे अधिरा आणि रोहन यांच्या नात्यातही वाद निर्माण झाले आहेत. आधी गोड दिसणारे नाते आता तणावग्रस्त होत चालले आहे. अधिरा-रोहनमधील या भांडणांमुळे कथानकाला वेगळं वळण मिळत असून, त्यांच लग्न होईल की नाही प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वानंदीवर कौटुंबिक दबावही वाढलेला आहे. वडिलांच्या इच्छेनुसार तिने लग्नाला होकार दिल्यामुळे तिचं आयुष्य एका नवीन टप्प्यावर जाण्याच्या मार्गावर आहे. समरदेखील मुलीला भेटायला तयार झालेला आहे, त्यामुळे येत्या भागात प्रेक्षकांना स्वानंदी-समर यांच्यातील भावनिक चढउतार अधिक ठळकपणे पाहायला मिळतील. "वीण दोघांतली ही तुटेना" ही मालिका झी मराठीवर रोज सायंकाळी ७.३० वाजता पाहता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.