
Savalyachi Janu Savali: झी मराठी वरील मालिका 'सावळ्याची जणू सावली' मालिकेला प्रेक्षकनाची खास पसंती मिळत आहे. मालिकेतील गोंधळानंतर आता हळू हळू सावली सारंगच्या नात्यात प्रेम खुलू लागल्याचे दिसत असून यामुळे चाहते आणि प्रेक्षकवर्गाला या मालिकेतील सावली सारंग केमेस्ट्री पाहायला आवडत आहे.
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सारंग हॉस्पिटलमधून घरी आलाय. तर सावलीला एका संगीत स्पर्धेची माहिती मिळालेय. पण सराव करतानाच सारंगची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. ऐश्वर्या सावलीला सारंगसंबंधी अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करते, पण पहिल्यांदाच सावली ऐश्वर्या विरुद्ध मेहेंदळे कुटुंबासमोर ठामपणे उभी राहणार आहे.
सारंग बरा होत असतानाच सावलीला त्याच्याप्रती असलेल्या काळजीमुळे वैयक्तिकरित्या तिचे आभार मानतो. सारंग सखदेवला मदतीचा हात पुढे करतो, पण सावली आणि सखदेव दोघेही यासाठी नकार देतात. तिलोत्तमा होळीसाठी तारा आणि भैरवीला आमंत्रित करते. होळीच्या दिवशी सावलीला, तारा आणि सोहम एकमेकांना मिठी मारताना दिसतात.
त्याच क्षणी तारा आणि सोहम सावलीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतात! सावलीला मनापासून ताराच्या आणि सोहमच्या नात्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, सारंग सावलीला महापूजेच्या विधीसाठी बोलावतो. सावली महापूजेचे सगळे विधी पार पाडते. पण हा त्यांचा आनंद अल्पकाळ टिकणारा ठरतो. ऐश्वर्याला अस्मीचा फोन येतो आणि त्याच वेळी जगन्नाथला गुंडांकडून धक्कादायक बातमी मिळते. काय असणार ही धक्कादायक बातमी ? होळी मध्ये सावली आणि सारंगच्या नात्याला नवीन वळण मिळेल ? तेव्हा बघायला विसरू नका 'सावल्याची जणू सावली' दररोज संध्या ७ वा. फक्त झी मराठीवर.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.