Sanai Chaughade: ३०० कोटींची मालकीण पुन्हा छोट्या पडद्यावर? 'सनई चौघडे' मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Sanai Chaughade: झी मराठीच्या ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेत्री अनिता दातेची एन्ट्री होणार असून कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Sanai Chaughade
Sanai ChaughadeSaam Tv
Published On

Sanai Chaughade: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सनई चौघडे’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका चर्चेत असताना आता आणखी एक मोठी एन्ट्री होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते-केळकर लवकरच या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अनिता दाते म्हणजेच राधिकामसाले हा बिझनेस असणारी राधिका आता ‘सनई चौघडे’च्या माध्यमातून झी मराठीवर पुनरागमन करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तिच्या भूमिकेची झलक दाखवण्यात आली असून, तिच्या एन्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकात मोठं वळण येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Sanai Chaughade
Jacqueline Fernandez ED Case: जॅकलिन फर्नांडिसला माफीची साक्षीदार बनवण्यास ईडीचा विरोध; कोर्टात अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप

‘सनई चौघडे’ ही मालिका चार मुलींच्या आयुष्याभोवती फिरणारी कौटुंबिक कथा आहे. या मालिकेत मेघना एरंडे, राज हंचनाळे, चिन्मयी साळवी आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. मालिकेला प्राइम टाइम स्लॉट मिळाल्यापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Sanai Chaughade
Actress Domestic Violence: सिनेसृष्टीत खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीला पतीकडून मारहाण आणि छळ, गुन्हा दाखल; संसार मोडणार?

दरम्यान, अनिता दातेच्या एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्या पुनरागमनाचं स्वागत केलं आहे. अनेकांनी “राधिकामसालेवाले परत आली”, “आता मालिकेत खरी रंगत येणार” अशा कमेंट केल्या आहेत. तिच्या दमदार अभिनयामुळे मालिकेचा टीआरपी आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याआधीही या मालिकेत अनेक नव्या कलाकारांच्या एन्ट्रीमुळे कथानकात नवे ट्विस्ट पाहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वी तू तिथे मी मालिकेत सत्यजीत ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकर यांचीही मालिकेत एन्ट्री झाली होती. त्यामुळे ‘सनई चौघडे’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com