Paru Marathi Serial: 'काही पण दाखवाल...'; वडिलांनीच दिलं पारूला विष, प्रेक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

Paru Zee Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पारू' सध्या एका धक्कादायक वळणावर पोहोचली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.
Paru Zee Marathi Serial
Paru Zee Marathi SerialSaam Tv
Published On

Paru Zee Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पारू' सध्या एका धक्कादायक वळणावर पोहोचली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पारूच्या वडिलांनीच तिच्या जेवणात विष मिसळल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.

कथानकानुसार, पारूच्या वडिलांना गुरुजींकडून इशारा मिळतो की, पारूच्या जीवाला धोका आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी मारुती (पारूचे वडील) सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु परिस्थितीच्या ओघात तो पारू आणि आदित्यला एकत्र पाहतो. या दृश्यामुळे त्याला धक्का बसतो आणि तो पारूच्या जेवणात विष मिसळण्याचा निर्णय घेतो.

Paru Zee Marathi Serial
Savlyachi Janu Savali: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नवा ट्विस्ट; सारंग-अस्मीच्या लग्नात सावलीची घोड्यावरून एन्ट्री

पारू दुरून वडिलांचे हे कृत्य पाहते आणि त्यांच्या निर्णयाचा मान राखत विष मिसळलेली खीर खाते. त्यानंतर ती बेशुद्ध पडते, असे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. या प्रसंगामुळे प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Paru Zee Marathi Serial
Shreyas Talpade: जाता जाता त्यांचे आभार मानेन...; 'चल भावा सिटीत' शोसाठी श्रेयस तळपदेची भावुक पोस्ट

सोशल मीडियावर या प्रोमोवर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहीले, 'सूर्यवंशम खीर'. तर, दुसऱ्याने लिहिले, 'तुम्हाला शपथ आहे, तिला कोणत्याही परिस्थितीत जिवंत करु नका..'. तर, आणखी एकाने लिहिले, 'येड्याचा बाजार फालतू गिरी' या कमेंटमुळे पारु या मालिकेत नक्की काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com