Tula Japnar Aahe: वेदावर हल्ला आणि शिवनाथमुळे अंबिका कैद; अंबिका, मीरा आणि अथर्वला कशी एकत्र आणेल?

Tula Japnar Aahe Marathi Serial: झी मराठी वरील नवी मालिका 'तुला जपणार आहे' मध्ये नव्या ट्विस्टला सुरुवात झाली आहे. मालिकेत अंबिकाचा वेदाच्या रक्षणासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरूच आहे.
tula japnar ahe
tula japnar aheSaam Tv
Published On

Tula Japnar Aahe: झी मराठी वाहिनीवर सुरु झालेली 'तूला जपणार आहे' मालिका सध्या विशेष चर्चेत आहे. या आणि त्यातील ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला आवडत आहेत. 'तूला जपणार आहे' मालिकेत अंबिकाचा वेदाच्या रक्षणासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरूच आहे. अथर्व आणि माया एका पवित्र विधीसाठी बसतात, पण अंबिका अस्वस्थ आहे, तिला हा विधी होऊ द्यायचा नाहीये कारण तिला जाणीव आहे की पुढे काहीतरी अनर्थ ओढवू शकतो.

विधी सुरू असतानाच वेदा पाण्यात पडते, आणि गोंधळ उडतो. मीरा वेदाला वाचवण्यासाठी धाव घेते, हे पाहून अंबिकाला जाणवतं की मीरा हीच वेदाच्या रक्षणासाठी योग्य व्यक्ती आहे. मीरा वेदाला वाचवण्यासाठी धावत जात असतानाच त्या गडबडीत अथर्व व मायाच्या विधीमध्ये अडथळा येतो. या सगळ्याला अंबिका दैवी संकेत मानते. अथर्व वेदाला वाचवण्यासाठी पुढे जातो, पण तेव्हाच त्याला कळते की मीराने, वेदाचा जीव वाचवला आहे. अंबिका आता मीरासोबत जास्त वेळ लागतेय आणि तिला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करतेय.

tula japnar ahe
Ekta Kapoor: स्वतःचे पैसे गुंतवा... एकता कपूरने अनुराग कश्यप आणि हंसल मेहतांवर टीका केली! प्रेक्षकांनाही फटकारले, जाणून घ्या प्रकरण

दरम्यान, रंगराज बाबा मीराच्या बंडखोरीला वैयक्तिक अपमान मानून सूड उगवायचं ठरवतो. काकूच्या मदतीने तो मीरासाठी सापळा रचलाय. त्याचवेळी, मीरा नकळत अंबिकाला स्मशानभूमीत घेऊन जाते. तिथे शिवनाथ,अंबिकाला कैद करणार आहे. अंबिका कैद झाल्यामुळे माया तिचे मनसुबे सहज अमलात आणते. वेदावर पुन्हा अज्ञात शक्ती हल्ला करतात. तिथेच, रंगराज बाबाच्या लोकांकडून मीराचे अपहरण होते, आणि तिला जबरदस्तीने आश्रमात नेलं जातं. रंगराज बाबाने आपल्या नीच हेतूंसाठी आश्रमात एक शामियाना तयार केलाय. अंबिका कैद असल्यामुळे वाटत असूनही ती मीराची मदत करू शकत नाही.

tula japnar ahe
Shahrukh Khan: आमचा धर्म कोणता...? लेकीच्या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं आश्चर्यचकीत करणार उत्तर

पण तेव्हाच, तिच्या अग्नीच्या वर्तुळात एक चाफ्याचं फूल उमलतं आणि लगेच नाहीसं होतं. रंगराज बाबा मीरावर हल्ला करणार इतक्यात, अंबिका मीराच्या साहाय्याने रंगराज बाबावर हल्ला करते आणि मीराला वाचवते. संतापाच्या भरात मीरा रंगराज बाबावर प्रहार करते, ज्यामुळे तो गंभीर जखमी होतो. रंगराजबाबावर केलेल्या या प्रहारामुळे मीरावर काय परिणाम होईल? अंबिका, मीरा आणि अथर्वला कशी एकत्र आणेल? बघायला विसरू नका 'तुला जपणार आहे' दररोज रात्री १०:३० वा. फक्त झी मराठीवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com