Tula Japnar Aahe: देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त; 'तुला जपणार आहे' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

Tula Japnar Aahe Marathi serial : झी मराठी सुरु झालेली नवी मालिका 'तुला जपणार आहे' या मालिकेत नवीन ट्विस्टला सुरुवात झाली आहे. मालिकेतील मुख्य पत्रासाठी हे पुढील भाग फार महात्वाचे आहेत.
tula japnar ahe
tula japnar aheSaam Tv
Published On

Tula Japnar Aahe: झी मराठी सुरु झालेली नवी मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. 'तुला जपणार आहे' या मालिकेतील पात्र आणि स्टोरीलाईन प्रेक्षकांना फार आवडत आहे. सध्या 'तुला जपणार आहे' या मालिकेत नवीन ट्विस्टला सुरुवात झाली असून मालिकेतील मुख्य पत्रासाठी हे पुढील भाग फार महात्वाचे आहेत.

'तुला जपणार आहे' मालिकेने प्रेक्षकांसाठी एक वेगळं पण मनाला भावणारं कथानक टीव्हीवर आणलंय. मागच्या आठवड्यात पात्राची ओळख झाली असेलच. पण येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मालिकेत काय पाहायला मिळेल याची थोडी कल्पना. तर अंबिकाला घरात प्रवेश आणि देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. देवीच्या कृपेने तिला शक्ती प्राप्त होते.

tula japnar ahe
Govinda and Sunita Ahuja Divorce: गोविंदाचा होणार डिव्होर्स; ३७ वर्षांची लग्नगाठ मोडणार, सुनीतानेच सांगितलं कारण

जसा घराच्या दरवाजात बांधलेला पवित्र दोरा (दहन) जळतो, तशी अंबिका वेदाचे रक्षण करण्यासाठी घरात प्रवेश करते. वेदाचे प्राण वाचतात पण जे कोण ह्यात सामील आहेत त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय अंबिका करते. दरम्यान, मीरा आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी गावात मोठ्या सणाचे आयोजन करण्याचे वचन देते. ती कुंकवाचा कलश उचलून हा सण पूर्ण करण्याचा निर्धार करते. अंबिका घरात वेदाच्या जीवावर उठलेल्या लोकांना धडा शिकवत असतानाच, मायाला जाणवतं की पवित्र दोरा तुटला आहे.

tula japnar ahe
RD Marathi Movie: 'आरडी'तून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम; चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च

नेमकं याच क्षणापासून मायाच्याही जीवाला धोका निर्माण झालाय. तर दुसरीकडे उत्सवाच्या विधी एक-एक करत पूर्ण करायचा मीराचा संघर्ष सुरु आहे. आता मीरा उत्सवाचे सगळे विधी पार करू शकेल ? अंबिका कश्या प्रकारे वेदाची रक्षा करेल? बघायला विसरू नका 'तुला जपणार आहे' सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठीवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com