Govinda and Sunita Ahuja Divorce: गोविंदाचा होणार डिव्होर्स; ३७ वर्षांची लग्नगाठ मोडणार, सुनीतानेच सांगितलं कारण

Govinda and Sunita Ahuja : गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी येत आहे. त्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक चालले नसल्यामुळे गोविंदाचा लवकरच घटस्फोट होऊ शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
Govinda and Sunita Ahuja Divorce
Govinda and Sunita Ahuja DivorceSaam Tv
Published On

Govinda and Sunita Ahuja : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. आता अशी बातमी येत आहे की दोघांच्याही वैवाहिक जीवनात सगळं काही ठीक नसून गोविंदाचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि यामुळे या कपलचा लवकरच घटस्फोट होणार आहे.

सुनीता गोविंदासोबत राहत नाही का?

गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या बातम्या आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार आहे. सुनीताने अलीकडील अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाच्या अफेअरबद्दल हिंट दिली आहेत. तसेच तिने दोघेही वेगवेगळ्या घरात राहत असल्याचे सांगितले आहेत . सुनीता तिच्या मुलांसह फ्लॅटमध्ये राहते. गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो.

Govinda and Sunita Ahuja Divorce
Chhaava Box Office Collection Day 11: 'छावा' आणि 'पुष्पा २' मध्ये काटें की टक्कर; ११ दिवसांत केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

दरम्यान, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंधांबद्दल गोविंदा आणि सुनीता यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे फक्त गोविंदा आणि सुनीताच सांगू शकतात.

Govinda and Sunita Ahuja Divorce
Ranveer Allahbadia Controversy: रणवीरने महाराष्ट्र सायबर सेलसमोर दिला जबाब; कॅमेऱ्या बघताच लपवला चेहरा, VIDEO व्हायरल

गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न १९८७ मध्ये झाले होते. दोघांचेही लग्न खूप कमी वयात झाले. त्यावेळी सुनीता फक्त १८ वर्षांची होती. सुनीता आणि गोविंदा यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com