Ranveer Allahbadia Controversy: रणवीरने महाराष्ट्र सायबर सेलसमोर दिला जबाब; कॅमेऱ्या बघताच लपवला चेहरा, VIDEO व्हायरल

Ranveer Allahbadia : समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमधील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणामुळे युट्यूबर रणवीर अलाहबादिया आज महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर राहून त्याचा जबाब नोंदवला आहे.
Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia Newssocial media
Published On

Ranveer Allahbadia Controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'वरील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी युट्यूबर्स आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहबादिया यांनी नवी मुंबईतील महाराष्ट्र सायबर सेल मुख्यालय आज हजेरी लावली. यावेळी, दोन्ही युट्यूबर्स मीडियाला टाळताना दिसले. 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये पालकांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल युट्यूबर रणवीर अलाहबादिया सोमवारी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर होऊन त्याचा जबाब नोंदवला आहेत.

महाराष्ट्र सायबरने समन्स बजावले होते

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी सोमवारी महाराष्ट्र सायबरसमोर 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले.

Ranveer Allahbadia
Sridevi Death Anniversary: मुलीसाठी स्वतः मुलगा...; श्रीदेवीची 'ही' इच्छा राहिली अधुरी

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबरने जारी केलेल्या समन्सला प्रतिसाद म्हणून अलाहबादिया आणि चंचलानी दुपारी नवी मुंबईतील महापे येथील मुख्यालयात पोहोचले.

Ranveer Allahbadia
Anupama: अनुपमा मालिकेमध्ये होणार अनुजची रिएन्ट्री; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

जबाब नोंदवला

महाराष्ट्र सायबरचे अधिकारी दोन्ही युट्यूबर्सचे जबाब नोंदवले आहेत. यूट्यूब शो दरम्यान अश्लील टिप्पणी केल्याबद्दल अलाहबादिया आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याची महाराष्ट्र सायबर पोलिस चौकशी करत असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com