Lakshmi Niwas Marathi Serial
Lakshmi Niwas Marathi SerialSaam Tv

Lakshmi Niwas: जान्हवीची जयंतपासून सुटका, भावना-सिद्धूच्या नात्याची नवी सुरुवात; 'लक्ष्मी निवास'मध्ये येणार 'हे' मोठे ट्विस्ट

Lakshmi Niwas Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. या मालिकेत येत्या काळात दोन मोठे ट्विस्ट घडणार आहेत.
Published on

Lakshmi Niwas Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये मालिकेत दोन मोठे ट्विस्ट येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. एक म्हणजे जान्हवीचे आत्महत्येचे पाऊल आणि दुसरा म्हणजे भावनाने सिद्धूला दिलेल्या प्रेमाची कबूली.

कथानकानुसार, जान्हवीला जयंतचा खोटेपणा उघड झालेला असतो. तिच्या आजीसोबत झालेल्या हल्ल्यामागे आणि वेंकीला विहिरीत ढकलण्यामागे जयंतच असल्याचे तिला कळते. या गोष्टीमुळे जान्हवीला थक्काबसतो आणि ती जयंतला शिक्षा देण्याचा निर्णय घेते. नवीन प्रोमोमध्ये ती जयंतला खुर्चीवर बांधून त्याच्यावर बंदूक रोखताना दाखवली आहे. या सीनमध्ये जान्हवीची वेदना आणि संताप दोन्ही स्पष्टपणे दिसतात.

 Lakshmi Niwas Marathi Serial
Bigg Boss 19: रात्री कपडे बदलणार होती तेवढ्यात...; अभिषेकच्या 'या' वागण्यामुळे अशनूर संतापली

या सर्व गोंधळानंतर जान्हवी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेते. समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा तिचा विचार असल्याचे प्रोमोमध्ये दिसते. त्यामुळे मालिकेत पुढे तिचे काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दुसरीकडे, मालिकेत भावनाच्या आयुष्यातही एक नवीन वळण येते. भावना सिद्धूसमोर एका बोटीत आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. सिद्धू तिच्या प्रस्तावाला काय उत्तर देतो, हाही प्रेक्षकांसाठी मोठे ट्विस्ट आहे.

 Lakshmi Niwas Marathi Serial
Dia Mirza: दिया मिर्झाचा क्लासिकल फ्यूजन ड्रेस स्टाईल, या दिवाळीला तुम्हीही करा रिक्रिएट

या दोन्ही घटना एकत्र येताच ‘लक्ष्मी निवास’मध्ये तणाव आणि आनंद यांचा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचे हे विशेष भाग १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान मध्यावर प्रसारित होणार असून, या दोन ट्विस्टमुळे कथानकात नवा थरार निर्माण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com