Toxic Movie: यशच्या 'टॉक्सिक'ची जोरदार क्रेझ; ॲडव्हान्स बुकिंगमधूनच केली इतक्या कोटींची कमाई

Toxic Movie: यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या २४ तासांत २.५ लाख तिकिटांची विक्री झाली असून, चित्रपटाने अनेक मोठे विक्रम मागे टाकले आहेत.
Toxic Movie
Toxic MovieSaam Tv
Published On

Toxic Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २६ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवस आधी, २१ ऑगस्टपासून चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले. बुकिंगला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ‘टॉक्सिक’ बॉक्स ऑफिसवर मोठी ओपनिंग करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

पहिल्या २४ तासांत २.५ लाख तिकिटांची विक्री

‘टॉक्सिक’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या २४ तासांत तब्बल २.५ लाख तिकिटांची विक्री झाली. रविवार सकाळपर्यंत ‘बुकमायशो’वर दर तासाला १० हजारांहून अधिक तिकिटे विकली जात असल्याचे सांगितले जात आहे. सर्व भाषांचा विचार केला तर आतापर्यंत सुमारे ४.७ लाख तिकिटांची विक्री झाली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.

Toxic Movie
Govinda: गोविंदा संतापला; कायदेशीर कारवाईचा कडक इशारा, अफवा पसरवणाऱ्यांना थेट १०० कोटींचा फटका

‘जवान’, ‘ॲनिमल’ आणि ‘धुरंधर’ला मागे टाकले

ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या २४ तासांच्या आकडेवारीत ‘टॉक्सिक’ने अनेक लोकप्रिय चित्रपटांना मागे टाकल्याचे दिसते. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ची ६० हजार, शाहरुख खानच्या ‘जवान’ची १.५ लाख, तर रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ची १.३ लाख तिकिटे पहिल्या २४ तासांत बुक झाली होती. याच्या तुलनेत ‘टॉक्सिक’ची तब्बल २.५ लाख तिकिटे बुक झाली आहेत.

Toxic Movie
Actor FIR: प्रसिद्ध अभिनेत्याची दिग्दर्शकाविरोधात पोलिसांत धाव; मारहाण, धमकी अन् मानधन थकवल्याचा आरोप

हिंदीमध्येही यशची जबरदस्त क्रेझ

‘केजीएफ’नंतर यशची लोकप्रियता केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. याचा परिणाम ‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगवरही पाहायला मिळत आहे. रविवार सकाळी ८ वाजेपर्यंत चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने ॲडव्हान्स बुकिंगमधून ८ कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचे सांगितले जात आहे. तर कन्नड व्हर्जनमध्ये १० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. कन्नड आणि हिंदी व्हर्जनची एकत्रित कमाई १८ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.

स्टारकास्टही दमदार

टॉक्सिक’मध्ये यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात यश दुहेरी भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. मूळतः कन्नड आणि इंग्रजी भाषेत तयार झालेल्या या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत डबिंग करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com