Govinda: गोविंदा संतापला; कायदेशीर कारवाईचा कडक इशारा, अफवा पसरवणाऱ्यांना थेट १०० कोटींचा फटका

Govinda: गोविंदाने AI आणि सोशल मीडियावर स्वतःबद्दल किंवा कुटुंबाबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला असून, १०० कोटी रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मागण्याचे संकेत दिले आहेत.
Govinda
GovindaSaam Tv
Published On

Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या अफवांमुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजा यांच्याशी संबंधित काही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोविंदाने इंटरनेट युजर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना जाहीर सूचना दिली आहे. स्वतःबद्दल किंवा आपल्या कुटुंबाबाबत खोटी, बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये, असा इशारा त्याने दिला आहे.

IANSच्या वृत्तानुसार, गोविंदाने दिलेली ही जाहीर सूचना विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि इतर डिजिटल सामग्रीशी संबंधित आहे. आपल्या आयुष्याशी आणि कुटुंबाशी संबंधित माहिती पसरवण्यासाठी AIचा वापर करण्याची परवानगी कोणालाही दिलेली नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.

Govinda
Gavar-Bhopla Bhaji Recipes : कोकण स्पेशल गवार-भोपळ्याची भाजी अन् गरमागरम तांदळाची भाकरी, रात्रीच्या जेवणाचा गावरान बेत
Govinda
Actor FIR: प्रसिद्ध अभिनेत्याची दिग्दर्शकाविरोधात पोलिसांत धाव; मारहाण, धमकी अन् मानधन थकवल्याचा आरोप

नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

गोविंदाच्या सूचनेनुसार, त्याच्याशी संबंधित खोटी किंवा दिशाभूल करणारी सामग्री तयार करून ती सोशल मीडिया किंवा अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. बदनामी, गोपनीयतेचा भंग, ओळखीचा गैरवापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याशिवाय, संबंधित व्यक्तींविरोधात न्यायालयीन कारवाई करणार असून दोषी आढळणाऱ्यांकडून तब्बल १०० कोटी रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मागितली जाऊ शकते, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Govinda
Actress Hospitalised: प्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, तात्काळ रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत

खोट्या बातम्यांवर गोविंदाचा आक्षेप

काही यूट्यूब चॅनेल्स आणि सोशल मीडिया अकाऊंटवर गोविंदाबद्दल जाणीवपूर्वक दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा आरोप आहे. अशा प्रकारच्या वृत्तांमुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याची चिंता गोविंदाने व्यक्त केली आहे.

गोविंदाच्या नविन कामांबद्दल

दरम्यान, गोविंदा शेवटचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला होता. तसेच लवकरच तो नव्या चित्रपटात झळकणार आहे.आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमुळे त्याने थेट कायदेशीर इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com