Actor FIR: प्रसिद्ध अभिनेत्याची दिग्दर्शकाविरोधात पोलिसांत धाव; मारहाण, धमकी अन् मानधन थकवल्याचा आरोप

Actor FIR: ‘लापता लेडीज’मध्ये छोटूची भूमिका साकारणाऱ्या सत्येंद्र सोनीने दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग आणि अभिनेत्री प्रगती चौहान यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मारहाण, धमकी आणि मानधन न दिल्याचा आरोप.
 actor Satendra Soni files fir against director
actor Satendra Soni files fir against director Saam Tv
Published On

Actor FIR: आमीर खानच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटात ‘छोटू’ची भूमिका साकारणारा अभिनेता सत्येंद्र सोनी सध्या एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. सत्येंद्र सोनीने दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री प्रगती चौहान यांच्याविरोधात झिरो एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सत्येंद्र सोनीच्या तक्रारीनुसार, ‘पेड पालकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मानधन न देणे, मारहाण, गैरवर्तन, धमकी देणे आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, असे गंभीर आरोप त्याने केले आहेत. ही घटना मध्य प्रदेशातील मैहर येथे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जून महिन्यात घडली होती.

 actor Satendra Soni files fir against director
Salman Khan's Gym Fire: सलमान खानच्या जिमला भीषण आग; नेमकं काय घडलं?

बुटकेपणावरून थट्टा केल्याचा आरोप

सत्येंद्र सोनीने त्याच्या तक्रारीत आपल्या शारीरिक रूपावरून आणि बुटकेपणामुळे आपली थट्टा करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सेटवर उपस्थित काही स्थानिक लोक त्याच्या परवानगीशिवाय त्याला उचलून फोटो काढत होते. या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे त्याने म्हटले आहे. सत्येंद्रच्या म्हणण्यानुसार, त्याने प्रॉडक्शन टीमकडे याबाबत तक्रार केली होती; मात्र त्याच्या सुरक्षेकडे योग्य लक्ष दिले नाही. तसेच, दिग्दर्शकाची पत्नी प्रगती चौहानने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आणि मानधन देण्यास नकार दिल्याचा आरोपही त्याने केला आहे.

 actor Satendra Soni files fir against director
Actress Hospitalised: प्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, तात्काळ रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत

मानधनाबाबतही वाद

सत्येंद्र सोनी याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पेड पालकी’साठी त्यांचे एकूण तीन लाख रुपये मानधन ठरले होते. दररोज ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते आणि त्याला ५० हजार रुपये आगाऊ मिळाले होते. उर्वरित रक्कम शूटिंगदरम्यान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चित्रीकरणाच्या ठिकाणी गेल्यानंतर मानधन रकडवण्यात आले. तसेच, सेटवर सुरुवातीला कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध नव्हत्या. नंतर एक व्हॅन देण्यात आली, मात्र ती सर्व कलाकारांना सामायिक पद्धतीने वापरावी लागतं होती. त्याचबरोबर जवळपास १६ तास काम करूनही जेवणासाठी केवळ एक समोसा मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

AICWA कडून पाठिंबा

या प्रकरणात ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) सत्येंद्र सोनी आणि अभिनेता श्रीधर दुबे यांना पाठिंबा दिला आहे. संघटनेने या आरोपांकडे गांभीर्याने पाहत असल्याचे सांगितले आहे. AICWA अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी दोन्ही कलाकारांशी संपर्क ठेवून त्यांना कायदेशीर प्रक्रियेत मदत केल्याचे संघटनेने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com