Wrestling star Passes Away: जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Wrestling star Passes Away: जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार हल्क होगन (टेरी बोलेया) यांचे गुरुवारी २४ जुलै रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Wrestling star Hulk Hogan passes away on 24th july due to cardiac arrest at age 71
Wrestling star Hulk Hogan passes away on 24th july due to cardiac arrest at age 71Saam Tv
Published On

Wrestling star Passes Away: जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार हल्क होगन (टेरी बोलेया) यांचे गुरुवारी २४ जुलै रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेले होगन हे WWE मुळे लोकप्रिय झाले. १९८० आणि १९९० च्या दशकात हल्क होगन यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आणि जगभरात आपली छाप पाडली.

हल्क होगनच्या निधनाबद्दल, WWE ने X वर म्हटले की, "WWE ला हल्क होगन यांचे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले आहे. पॉप संस्कृतीतील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक असलेल्या होगनने १९८० च्या दशकात WWE ला जागतिक ओळख मिळवून देण्यास मदत केली."

Wrestling star Hulk Hogan passes away on 24th july due to cardiac arrest at age 71
Saiyaara Box Office Collection: 'सैयारा'ची आठवड्याभरात छप्परफाड कमाई; सातव्या दिवशी केला इतक्या कोटींचा गल्ला

सहा WWE चॅम्पियनशिप जिंकल्या

होगन हे WWE च्या पाच दशकांच्या इतिहासातील सर्वात मोठे स्टार होते. १९८५ मध्ये झालेल्या पहिल्या रेसलमेनियामध्ये ते मुख्य आकर्षण ठरले. या कार्यक्रमात त्याने आंद्रे द जायंट आणि रँडी सॅव्हेजपासून ते द रॉक आणि विन्स मॅकमहोनपर्यंत सर्वांचा सामना केला. होगन यांनी सहा WWE चॅम्पियनशिप जिंकल्या आणि २००५ मध्ये सिल्वेस्टर स्टॅलोनने त्यांना WWE हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले.

Wrestling star Hulk Hogan passes away on 24th july due to cardiac arrest at age 71
Aashiqui 3: 'आशिकी 3'मध्ये पुन्हा दिसणार आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी?

चित्रपट आणि टेलिव्हिजन शो

होगन यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे, ज्यात VH1 वरील त्याच्या जीवनावर आधारित रिअॅलिटी शो "होगन नोज बेस्ट" याचा समावेश आहे. १९८५ मध्ये झालेल्या पहिल्या रेसलमेनियामध्ये ते मुख्य आकर्षण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com