

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर पुन्हा चर्चेत आला आहे. दरवेळी हा अभिनेता त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत येत असतो. पण यावेळी सोशल मीडियावरील एक निर्णयामुळे त्याच्या चर्चा सुरू आहेत. करण जोहरने अचानक त्याच्या जवळच्या अनेक मित्रमंडळींना आणि कलाकारांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. ही चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होते.
करण जोहरने शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूर खान, मनीष मल्होत्रा यांसारख्या त्याच्या जवळच्या व्यक्तींना अनफॉलो केलं आहे. हे पाहून नेटकरी थक्क झालेत. कारण करण आणि या कलाकारांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात काही बिनसलंय का? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.
तसेच करण जोहरने वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा आणि अनन्या पांडे यांनाही अनफॉलो केल्याचं नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनलाही त्याने अनफॉलो केलंय. पण कार्तिक लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या ‘नागझिला’ या चित्रपटात झळकणार असल्यामुळे या निर्णयामागचं कारण काय? असा प्रश्न करणच्या चाहत्यांना पडला आहे.
आता समोर आलेल्या माहितीनुसार, करण जोहरचा हा निर्णय कोणत्याही वादामुळे घेतलेला नाही. एका रिपोर्टनुसार, हा फक्त सोशल मीडिया स्ट्रॅटेजीचा भाग असल्याचं सांगितलं जातय. सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित आणि काही बदल करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कोणत्याही कलाकारासोबत त्याचे मतभेद नसल्याचंही सांगितलं जातय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.