Ram Gopal Varma: राम गोपाल वर्माने चुंबन घेतलेली युवती कोण? चर्चांना उधाण

राम गोपाल वर्मा यांच्या एक विक्षिप्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ram Gopal Varma-Ashu Reddy
Ram Gopal Varma-Ashu ReddyInstagram @ashu_uuu

Ram Gopal Varma-Ashu Reddy News: चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राम गोपाल वर्मा हे एके काळी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक होते, पण आता त्यांची क्रेझ संपली आहे. राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यावर बोलतात. राम गोपाल वर्मा नेहमी त्यांच्या विधानांनी किंवा विचित्र कृत्यांनी गदारोळ निर्माण करतात. त्यांचा असाच एक विक्षिप्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा बिग बॉसची माजी स्पर्धक आशु रेड्डीसोबत दिसत आहे.

राम गोपाल वर्मा यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते अभिनेत्री आशुशी बोलत आहेत. मुलाखतीदरम्यान, त्यांनी अभिनेत्रीचा पाय पकडला आणि तिच्या पायाच्या बोटांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हे राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्रींच्या इच्छेनेच केले होते.

Ram Gopal Varma-Ashu Reddy
Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा यांनी 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर

राम गोपाल वर्माचा हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते एका अभिनेत्रीचे पाय चाटताना दिसत आहे. या धक्कादायक व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मासोबत दिसणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून बिग बॉस फेम आशु रेड्डी आहे. (Viral Video)

राम गोपाल वर्मा आणि आशु रेड्डी यांच्या मुलाखतीदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या मुलाखतीत आशू सोफ्यावर बसली आहे तर दिग्दर्शक जमिनीवर बसलेला दिसत आहेत. या मुलाखतीत दोघांनीही सेक्स, पॉर्न आणि पर्सनल लाईफवर उघडपणे चर्चा केली आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा राम गोपाल वर्मा तिच्या मांडीवर भाष्य करतात तेव्हा आशू दिग्दर्शकाला प्रेमाने चापट मारताना दिसत आहे. (Celebrity)

आशुबद्दल सांगायचे तर आशु एक अभिनेत्री आहे जी सोशल मीडिया इंफ्लुएन्सर आहे. आशु रेड्डीने तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे. 2019 मध्ये, आशु बिग बॉस तेलुगु सीझन 3 च्या स्पर्धकांपैकी एक होता. हा रिअॅलिटी शो नागार्जुनने होस्ट केला होता.

आशु रेड्डी एक तेलुगु चित्रपट अभिनेत्री आणि सोशल मीडिया इंफ्लुएन्सर आहे. आशु रेड्डी अमेरिकेत राहते. इंस्टाग्रामवर तिचे 1.8 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत आणि YouTube वर 2.4 दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर आहेत. तिने 2018 मध्ये 'चल मोहन रंगा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com