Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा यांनी 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची किमया दाखवली होती.
Top 5 Movies of Ram Gopal Varma
Top 5 Movies of Ram Gopal VarmaInstagram @ram_gopal_varma_fc
Published on

Ram Gopal Varma Top 5 Movies: राम गोपाल वर्मा हे त्यांच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. सिव्हिल इंजिनीरिंगचे शिक्षण घेतलेल्या राम गोपाल वर्मा यांचा जन्म 7 एप्रिल 1962 रोजी झाला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची किमया दाखवली होती. गुन्हेगारीवर आधारित चित्रपटांचे गुरू मानले जाणारे राम गोपाल वर्मा त्यांच्या मित्रांमध्ये रामू म्हणून ओळखले जातात.

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस नायजेरियात घालवले. हैदराबादला परत आल्यावर त्यांनी व्हिडीओ कॅसेट भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळवला. आपण आता राम गोपाल वर्मा यांचे असे पाच चित्रपट पाहूया, ज्यामुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठा ब्रँड बनले.

Shiva
Shiva Saam Tv

शिवा

1989 मध्ये, राम गोपाल वर्मा यांनी शिवा या तेलुगु चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. तर १८९९ मध्ये त्यांनी शिवा चित्रपटाचा याच नावाचा हिंदी रिमेक बनवून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. चित्रपटाची कथा महाविद्यालयीन गुंडगिरीवर आधारित आहे. राम गोपाल वर्मा यांनी त्याच्या महाविद्यालयीन जीवनातील बऱ्याच गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवल्या आहेत. या चित्रपटातूनच नागार्जुनने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

Rangeela
Rangeela Saam Tv

रंगीला

रंगीला चित्रपटापर्यंत राम गोपाल वर्मा यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाऊ लागले. आमिर खानने स्वतः राम गोपाल वर्मा यांना स्वतःसाठी एक चांगला विषय शोधण्यास सांगितले. राम गोपाल वर्मा कॉलेजच्या दिवसांपासून श्रीदेवीचे चाहते होते. या विषयावर त्यांनी मस्त चित्रपटही बनवला. पण त्यापूर्वी त्यांनी श्रीदेवीबद्दलची क्रेझ रंगीला चित्रपटात दाखवली. मिली सुपरस्टार बनते आणि मुन्नाला वाटते की ती सुपरस्टार राज कमलच्या प्रेमात आहे. हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा चित्रपटांपैकी एक आहे ज्याचा हॉलीवूडने रिमेक केला आहे.

Satya
Satya Saam Tv

सत्या

राम गोपाल वर्मा यांनी सत्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडला भिखू म्हात्रे हा नवीन डॉन दिला. मनोज वायपेयीला या चित्रपटाने स्टार बनवले. तोवर मनोज वाजपेयी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करायचे. या चित्रपटामध्ये राम गोपाल वर्मा यांनी साऊथ स्टार जे डी चक्रवर्ती यांना देखील हिंदी चित्रपट सृष्टीत आणले. सत्या चित्रपटामुळे राम गोपाल वर्मा यांना अनेक पुरस्कार मिळाले.

Company
Company Saam Tv

कंपनी

सत्या चित्रपटातील दमदार अभिनयाने मनोज वाजपेयींची हिंदी चित्रपटसृष्टीला ओळखझाली. तर मुंबई अंडरवर्ल्डवर आधारित फिल्म कंपनीने विवेक ओबेरॉयला हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले. कथित छोटा राजनवर आधारित चंदू नागरे ही या चित्रपटातील व्यक्तिरेखा सुपरहिट ठरली होती. शिवा आणि सत्या नंतर हा चित्रपट राम गोपाळ वर्मा यांच्या क्राइम ट्रायलॉजीचा तिसरा भाग ठरला. या चित्रपटात अजय देवगण काहीशी दाऊद इब्राहिम सारखी भूमिका साकारताना दिसला होता. मनीषा कोईराला आणि सीमा विश्वास यांनी देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती.

Sarkar
SarkarSaam Tv

सरकार

राम गोपाल वर्मा यांचा सरकार हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'द गॉडफादर'चा रिमेक आहे असे मानले जाते. पण, राम गोपाल वर्मा यांच्या या चित्रपटातील मुख्य पात्र बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे ठेवले होते. या चित्रपटात अभिषेक बच्चनने त्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकार नेहमीच सशक्त भूमिका बजावत असतात. या चित्रपटात केके मेनन, अनुपम खेर, कोटा श्रीनिवास राव, सुप्रिया पाठक आणि तनिषा मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com