The Kashmir Files Unreported Trailer : विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेडचा हृदय पिळवटून टाकणार ट्रेलर प्रदर्शित

Vivek Agnihotri Share Trailer : विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
Kashmir Files Unreported' trailer out
Kashmir Files Unreported' trailer out Twitter
Published On: 

Vivek Agnihotri On The Kashmir Files Unreported: द काश्मीर फाईल्सच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि पलायन कशामुळे झाले याचा उलगडा केला आहे. हृदय पिळवटून टाकणारे, डोळे अंजन घालणारा हा ट्रेलर आहे.

2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये वेबसीरीज इतिहासकार, तज्ज्ञ, वास्तविक जीवनातील ज्यांनी हे सहन केलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांशी अनुभव दाखविण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये प्रत्येकजण आपली गोष्ट शेअर करताना भावूक होताना दिसत आहेत. कलम 370 रद्द करण्‍यात आले आहे आणि आज काश्मीरवर त्याचे परिणाम झाले.

'द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड'वर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

ZEE5 वर लवकरच प्रदर्शित होणार्‍या The Kashmir Files Unreported बद्दल बोलताना शोचे निर्माते विवेक अग्निहोत्री म्हणाले, “काश्मीरचा नरसंहार हा केवळ भारतालाच नाही तर मानवतेला कलंक आहे. ही आधुनिक काळातील सर्वात मोठी छुपी शोकांतिका मानली जाते. ही गोष्ट प्रामाणिकपणे सांगणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. (Latest Entertainment News)

Kashmir Files Unreported' trailer out
Alia Bhatt Spoke About Daughter: तिने बॉलिवूडमध्ये येऊ नये तर... आलियाने स्वतःच निवडलं मुलगी 'राहा'चं करियर

आत्तापर्यंत सर्व चित्रपट, साहित्य आणि प्रसारमाध्यमांमध्ये जे काही वृत्त आले ते समकालीन आहे. 32 वर्षांनंतर जेव्हा आम्ही 4 वर्षांच्या व्यापक संशोधनावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' बनवला तेव्हा लोकांचे डोळे उघडले. काहींना असे वाटले की चित्रपटात केवळ 10% वास्तव चित्रित केले गेले आहे आणि काहींना असे वाटले की द काश्मीर फाइल्स हा एक प्रचारात्मक चित्रपट आहे."

“म्हणून, सत्य हाताळणे कठीण आहे हे लोकांना समजण्यासाठी आम्ही केलेले सर्व संशोधन आणि मुलाखती त्याच्या प्युअर आणि रॉ स्वरूपात सर्वांसमोर आणणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. मी हमी देऊ शकतो की द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड तुमचे हृदय हेलावून टाकेल परंतु हेतू असा आहे की आपण इतिहासातून शिकू, आणि आम्ही दहशतवादाबद्दल कठोर निर्णय घेऊ आणि आम्ही मानवतेसाठी आणि आमच्या स्वतःच्या लोकांसाठी उभे आहोत, ” असे विवेक अग्निहोत्री म्हणले.

Kashmir Files Unreported' trailer out
Marathi Movie Fauj : 'फौज' द मराठा बटालियन ; चित्रपटातून उलघडणार मराठा शूरवीरांची शौर्यगाथा

पल्लवी जोशी यांची 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'बद्दल मत

सह-निर्माता आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी, ज्यांनी द काश्मीर फाईल्समध्ये नकारात्मक भूमिका केली होती, ती म्हणाली, “काश्मिरी पंडित समुदायाने आमच्याशी शेअर करताना ज्या खोल वेदना सहन केल्या, ते ऐकणे आमच्यासाठी खूप कठीण होते.

त्यांच्या हृदयद्रावक कथा ऐकल्यावर केवळ त्या दु:ख आणि वेदनांनी आम्ही प्रभावित झालो असे नाही, तर आम्हाला त्यांच्या पुढे खूप लहान वाटू लागले आणि हा इतिहास सरकार, प्रशासन, माध्यमे आणि इतरांनी आपल्याला इतकी वर्ष कळू दिले नाही हे लक्षात आले.

ती पुढे म्हणाली, "जेव्हा आम्ही द काश्मीर फाइल्स बनवला, तो 3 तासांचा चित्रपट होता, तो फक्त हिमनगाचा एक टोक होता आणि जेव्हा समाजातील एक घटक म्हणू लागला की हा असत्य आणि प्रचारात्मक चित्रपट आहे, तेव्हा आमच्या लक्षात आले की सत्य त्याच्या खर्‍या स्वरूपात लोकांसमोर आणण्याची गरज आहे. म्हणून आम्ही The Kashmir Files Unreported सादर करत आहोत.

ज्यामध्ये आम्ही केलेल्या विस्तृत संशोधनाची माहिती मिळेल आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही अशा कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. या पंडितांनी स्वतःच्या तोंडातून हे सर्व सांगितले आहे. त्यामुळे, काश्मीर भारतासाठी काय आहे आणि तो आपल्या देशाचा अविभाज्य भाग कसा आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने पाहिली पाहिजे अशी ही वेबसीरीज आहे."

विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी, IamBuddha Entertainment आणि Media LLP निर्मित, 7 भागांची मालिका ZEE5 वर प्रीमियर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.