Fauj The Maratha Battalion Motion Poster Out : मराठी चित्रपटांची सध्या रेलचेल आहे. एका पाठून एक असे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या चित्रपटांचा समावेश आहे. रोमँटिक, कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होत असताना ऐतिहासिक चित्रपट देखील आपल्या भेटीला येत आहेत. असाच एक ऐतिहासिक चित्रपट फौज आपल्या भेटीला येणार आहे.
फौज या चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली आहे. तसेच चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. मराठा बटालियनच्या सैनिकांची कथा सांगणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Latest Entertainment News In Marathi)
'फौज' हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो. देशासाठी सैनिकांनी दिलेले बलिदान निश्चितच अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण आपल्या घरांमध्ये सुरक्षित असतो. त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगणारा ‘फौज - द मराठा बटालियन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
फैज या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. स्वामी चरण फिल्म्स प्रस्तुत, निर्मित हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.
पोस्टरमध्ये फौजी सीमेवर देशाचे रक्षण करताना दिसत असून देशाच्या अभिमानासाठी आणि संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे सैनिक म्हणजे देशाची सर्वात मोठी संपत्ती. या शूरवीर फौजींची विजयगाथा 'फौज - द मराठा बटालियन’मधून पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ‘’ मराठा बटालियन ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. इंग्रजांच्या काळातही ही फौज होती. मराठा बटालियनला सर्वात चपळ आणि शूर मानली जाते. या मराठा बटालियनने इंग्रजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक शौर्य गाजवले आहे. त्याच एका शौर्यकथेमधील एक गोष्ट ‘फौज द मराठा बटालियन’ या सिनेमाच्याद्वारे आम्ही मांडतोय."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.