गाझियाबादमध्ये सुनंदा शर्मा कॉन्सर्टमध्ये घटना
चाहत्याने स्टेजवर जाऊन स्पर्श केला
गायिका घाबरून किंचाळली आणि बॅकस्टेजला पळाली
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले
पंजाबी गायिका आणि अभिनेत्री सुनंदा शर्मा हिच्या गाझियाबादमधील एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धक्कादायक घटना घडली. कॉन्सर्ट पाहायला आलेल्या एका तरुणाने सुनंदा हिला स्टेजवर येऊन स्पर्श केला. यादरम्यान गायिका भर कॉन्सर्टमध्ये जोरात किंचाळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या घटनेने कलाकारांच्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील राजकुमार गोयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गायिका सुनंदा शर्मा हीचा लाईव्ह कॉन्सर्ट ठेवण्यात आला होता. यादरम्यान तिचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
गायिका देखील मोठ्या उत्साहाने स्टेजवर सादरीकरण करत होती. इतक्यात एक तरुण सिक्युरिटी मोडून मंचावर गेला आणि गायिकेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. एवढेच नाही तर, या तरुणाने गायिकेच्या पायाला जबरदस्तीने स्पर्श केला. या स्पर्शाने गायिका घाबरली आणि भर कॉन्सर्टमध्ये जोरात किंचाळली.
गायिका सुनंदा हिच्या मायक्रोफोनमुळे तिचा तो आवाज संपूर्ण कॅम्पसमध्ये घुमला. त्यानंतर ती घाबरून बॅकस्टेजला पळून गेली. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ घटनास्थळावरून पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.