Vikrant Massey And Sheetal Thakur News: नवी सुरूवात! ‘क्रिमिनल जस्टिस’ फेम अभिनेत्याने चाहत्यांना दिली ‘Good News’, पोस्ट चर्चेत

Vikrant Massey Wife Sheetal Thakur Is Pregnant: विक्रांत मेस्सी आणि पत्नी शीतल ठाकुर लवकरच चाहत्यांना ‘Good News’ देणार आहेत.
Vikrant Massey Announce Wife Sheetal Thakur Revealed His Wife Pregnant
Vikrant Massey Announce Wife Sheetal Thakur Revealed His Wife PregnantInstagram
Published On

Vikrant Massey Announce Wife Sheetal Thakur Revealed His Wife Pregnant

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय, हे जाणून चाहते फारच उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी चाहत्यांना ‘गुड न्यूज’ देताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शोएब- दिपीका, इशिता- वत्सल आणि राहुल- दिशा यांनी आपल्या चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.

नुकतंच दिशा परमारने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून नुकतंच दिशाला आणि तिच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अशातच आणखी सेलिब्रिटी जोडी चाहत्यांना ‘गुड न्यूज’ देणार आहे. अभिनेता विक्रांत मेस्सी आणि पत्नी शीतल ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.

Vikrant Massey Announce Wife Sheetal Thakur Revealed His Wife Pregnant
Parineeti Chopra - Raghav Chadha: शिक्षण, संपत्तीमध्ये परिणीती चोप्रा राघव चड्ढापेक्षा सरस

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिनेता ‘गुड न्यूज’ देणार अशी सोशल मीडियावर चर्चा होत होती. पण अखेर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नातला एक फोटो शेअर केला आहे. त्याने तो फोटो शेअर करताना, त्यांचे बाळ २०२४ मध्ये येणार आहे, असे सांगितले. सोबतच फोटोला अभिनेत्याने ‘नवीन सुरुवात’ या आशयाचं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोघांवरही चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विक्रांत आणि शीतल पेशाने सिनेस्टार असून त्यांच्या दोघांची ही ओळख ALTBalaji च्या 'Broken But Beautiful' या वेब शोच्या सेटवर झाली होती. दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२२ ला नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत ते दोघेही लग्नबंधनात अडकले होते. २०१५ पासून ते एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर विक्रांत आणि शीतलने २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले.

Vikrant Massey Announce Wife Sheetal Thakur Revealed His Wife Pregnant
Parineeti And Raghav Sangeet Video: परिणीती-राघवच्या संगीत सेरेमनीचा Inside Video व्हायरल, कपलने गाण्यावर धरला ठेका

विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो ‘१२ वी फेल’, ‘सेक्टर ३६’ आणि त्यानंतर ‘हसीन दिलरुबा २’ मध्येही तो चित्रपटांमध्ये दिसणार आहे. विक्रांतला खरी ओळख ‘मिर्झापूर’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’मुळे प्राप्त झाली आहे. तर शीतलने ‘अपस्टार्ट्स’, ‘ब्रिज मोहन अमर रहे’ आणि ‘छप्पर फड के’ सारख्या अनेक चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफूल’ या चित्रपटामध्ये विक्रांतसोबत दिसली होती.

Vikrant Massey Announce Wife Sheetal Thakur Revealed His Wife Pregnant
TRP Rating Of Marathi Serial: ‘ठरलं तर मग’सह अनेक मालिका TRPमध्ये पिछाडीवर, तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ने मारली बाजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com