Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Famous Actress Death: ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचे २२ ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले. गेल्या तीन महिन्यांपासून त्या फुफ्फुसांच्या संसर्गाशी झुंज देत होत्या. ‘महाभारत’मधील कृपी भूमिकेमुळे त्या प्रसिद्ध होत्या.
Veteran film and TV actress Asha Singh passes away
Veteran film and TV actress Asha Singh passes awaySaam Tv
Published On

Famous Actress Death: हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचे मुंबईत निधन झाले. २२ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. आशा सिंह गेल्या तीन महिन्यांपासून फुफ्फुसांच्या संसर्गाशी झुंज देत होत्या. प्रकृती खाल्यामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

आशा सिंह यांनी चित्रपट आणि टीव्ही अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. विशेषतः टेलिव्हिजनवरील त्यांच्या कामामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयामुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

Veteran film and TV actress Asha Singh passes away
Govinda: गोविंदा संतापला; कायदेशीर कारवाईचा कडक इशारा, अफवा पसरवणाऱ्यांना थेट १०० कोटींचा फटका

'महाभारत'मधील 'कृपी'ची भूमिका गाजली

आशा सिंह यांना यश चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतील ‘कृपी’ या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली होती. या भूमिकेतील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. त्यांच्या कारकिर्दीतील ही भूमिका आजही त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. सत्तरच्या दशकात आशा सिंह यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम केले. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली.

Veteran film and TV actress Asha Singh passes away
Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

मनोरंजनविश्वातून श्रद्धांजली

आशा सिंह यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील योगदानाची आठवण काढत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्राने एक अनुभवी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com