Ved Box Office Collection: प्रेक्षकांना रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचं 'वेड'; बॉक्स ऑफिसवर सैराटलाही टाकलं मागे...

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.
Ved Box Office Collection
Ved Box Office CollectionSaam Tv

Ved Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. पहिल्या दिवसापासून यशस्वी घोडदौड करणाऱ्या चित्रपटाने आता पर्यंत ४४.९२ कोटी इतका गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला आहे. सैराट (2016) नंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातून रितेशच्या अभिनयासह दिग्दर्शनाचीही चर्चा सर्वत्र होत आहे.

Ved Box Office Collection
Ved Box Office Collection: 'वेड' चित्रपटाचा चौदाव्या दिवशी सुद्धा कोट्यावधींचा गल्ला

'वेड' चित्रपटाने शनिवारी ₹ 2.72 कोटींची कमाई केली असून रविवारी ही चित्रपट कमाईचा आकडा कदाचित वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'वेड' हा चित्रपट 'माजिली'तेलगू चित्रपटाचा रिमेक असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, 15 कोटींच्या बजेटमध्ये निर्मित केलेला हा चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर फक्त नफाच कमवत नाही, तर तो अनेक विक्रमही मोडीत काढत आहे.

Ved Box Office Collection
Shah Rukh Khan: शाहरुखही 'या' गोष्टीमुळे झाला पठानचा चाहता, 'या' पोस्टने झाले सर्वत्र कौतुक...

एका ट्रेड अॅनालिस्ट कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे,"वेड चित्रपटाची सर्वत्र खुप चांगली कमाई करत आहे. १६ व्या दिवशी या चित्रपटाने २.७२ कोटी इतकी रुपयांची कमाई केली आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखने बॉक्स ऑफिसवर आपली जादू निर्माण केली आहे."

रितेश आणि जेनेलिया व्यतिरिक्त, चित्रपटात सलमान खानचा खास पाहुणा देखील आहे. सलमान चित्रपटात वेड लागले या गाण्यात दिसला होता. या चित्रपटातून जेनेलियाने मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी जेनेलिया आणि रितेश हे हिंदी कॉमेडी चित्रपट मिस्टर मम्मीमध्ये एकत्र दिसले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com