
Shah Rukh Khan: सध्या 'पठान' चित्रपटाची हवा जगभरात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाची हवा सुरू झाली. एका बाजूला चित्रपटातील गाण्यांना आणि ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळतोय तर दुसऱ्या बाजूला चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. अशातच या चित्रपटातील शाहरुखला कोणती सर्वात जास्त गोष्ट आवडली हे त्याने सांगितलं आहे.
तो सध्या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त बराच सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यातच त्याने नुकते ट्विटरवरून चाहत्यांसोबत संवाद साधला होता. हा संवाद शाहरुखने (AskSRK) च्या माध्यमातून साधला होता. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने ‘पठान’ चित्रपटातील त्याला सर्वाधिक आवडलेल्या गोष्टीबद्दल भाष्य केलं.
शाहरुखच्या चाहत्याने त्याला "सर तुम्हाला पठाण चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच वातावरण बदलून टाकलं आहे, तर आता लवकरच तुफानही येईल.'पठान' चित्रपटात काम करताना तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती? याची कथा की आणखीन काही?"
यावर शाहरुखने प्रतिक्रिया देत उत्तर दिले की, “अनेक तरुणांनी हा चित्रपट बनवण्यात हातभार लावला आहे. ती सगळेजण खूप चांगली होती आणि आजही ते दिवस-रात्र मेहनत करत आहेत. त्यांच्याबरोबर काम करायला मला सर्वात जास्त मजा आली.” त्याच्या या उत्तराला अनेक चाहत्यांना आवडलं असून ते त्यावर आपल्या विविध प्रतिक्रिया देत आहेत.
शाहरुख तब्बल चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करत आहे. त्याचे या वर्षात तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यातील ' पठान' चित्रपट हा येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात किती यशस्वी होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.